Breaking News

आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील निकालानंतर मिलिंद नार्वेकरांची खोचक पोस्ट लघु सुक्ष्म दिलासा

मराठी ई-बातम्या टीम

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या काळात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत योग्य १० दिवसात त्या संबधित न्यायालयात शरण जा असे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेचे नेते तथा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अंत्यत विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर एक खोचक पोस्ट करत या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

या पोस्ट मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मंत्रीपदाचा संदर्भ साधत मिलिंद नार्वेकर यांनी “लघु, सुक्ष्म दिलासा” अशी खोचक आणि सूचक टीपण्णी केली आहे.

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असतानाच नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच या दोघांमध्ये विस्तव निर्माण होण्यामागे उध्दव ठाकरे यांचे विश्वासू आणि खाजगी सचिव कधी मिलिंद नार्वेकर यांचे नाव घेण्यात येत होते. तर कधी संभावित मुख्यमंत्री पदावरून उध्दव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यातच नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्यासह उध्दव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत आले आहेत. इतकेच नव्हे तर भाजपा-शिवसेना युती असताना नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर केवळ उध्दव ठाकरे दुखवायचे नसल्याने यासाठी नारायण राणे यांना भाजपाने थेट प्रवेश देण्याचे टाळले होते. मात्र युती तुटल्यानंतरच नारायण राणे यांना अधिकृत पक्षात प्रवेश दिला.

तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळाल्यानंतर पहिल्यादांच मुंबई आणि कोकण दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच विधिमंडळातही नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनीही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तीक टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. याप्रश्नी नुकत्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांच्या बेताल वक्तव्याप्रकरणी समज देण्याचा निर्णय झाला. यावरून राणे आणि ठाकरे यांच्यातील शत्रुत्व कमालीचे वाढल्याचे दिसून येत आहे.

Check Also

देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील

फडणवीस यांचा सवाल, पेट्रोल का महाग? उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा

महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता …

Leave a Reply

Your email address will not be published.