Breaking News

एमआयएमचा पाठिंबा, त्यावर भाजपाची टीका तर भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर भाजपाची बी टीम, सी टीम कोण अख्ख्या देशाने पाहिलंय

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर एमआयएमने आपल्या दोन आमदारांचा पाठिंबा अखेर काँग्रेसला जाहिर केला. तत्पूर्वी एमआयएमने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलिल यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेतील माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. मात्र आज सकाळी मतदानाच्या दिवशीच असुदद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत एमआयएमचा पाठिंबा काँग्रेसला देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर भाजपाने एमआयएमला मविआची बी टीम असल्याचा आरोप केला. या टीकेवरून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधाला.

शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, भाजपाची बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय. त्यामुळे भाजपाची विश्वासार्हता राहिली नसल्याचे मत व्यक्त करत म्हणाले की, भाजपाच्या बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय. त्यामुळे भाजपा कोणाबद्दल काहीही बोलली तरी त्यांच्या शब्दाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे भाजपा काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

भाजपाने महाविकास आघाडीचा एक संजय घरी जाणार अशी टीका केली. यावर भास्कर जाधव यांनी भाजपाचे लोक काहीही वक्तव्य करत असतात. परंतु संध्याकाळी पाच वाजता वस्तूस्थिती काय हे सर्वांच्या डोळ्यासमोर येईल असेही ते म्हणाले.

भाजपाने खूप मोठं संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं. परंतु आता एकदंर जे चित्र दिसतं आहे. त्यातून आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये भाजपाबद्दल असंतोष आहे. तो असंतोष संध्याकाळी मतमोजणीच्या निमित्ताने स्पष्ट होईल. २० तारखेची निवडणूक सुद्धा भाजपाने आपल्या मतांच्या कोट्यापेक्षा अधिक उमेदवार उभे करून महाविकास आघाडीत खूप मोठा असंतोष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपाच्या हवेत उडणाऱ्या या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल असा टोलाही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम आहेत, राहतील असे एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलिल यांनी सांगितले.

आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली असल्याचे सांगत महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *