Breaking News

आणि फडणवीसांच्या आक्षेपानंतर शिवसेनेने मागे घेतली हरकत सुनिल प्रभू यांनी हरकत मागे घेत असल्याचे जाहीर करत माहितीचा मुद्दा केला पुढे

मराठी ई-बातम्या टीम

दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांना पाहुन विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदाराने म्यॉव म्यॉव असा उच्चार करत चिडविण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा संदर्भ धरत शिवसेनेचे गटनेते सुनिल प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत आमदारांच्या वर्तनाबाबत निर्बंध असावेत आणि त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना आदेश द्यावेत अशी मागणी विधानसभेत केली.

सुनिल प्रभू यांनी मांडलेल्या हरकतीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत म्हणाले की, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काही वेळापूर्वीच आम्हाला सांगितले की एखादा विषयावर चर्चा सुरु असेल तर त्यावेळी त्या विषयाशी संबधित हरकतीचा मुद्दा मांडता येतो. मग आता चर्चा सुरुच नाही तर हरकतीचा मुद्दा कसा मांडता येतो असे सूचक आव्हान दिले.

त्यावर सुनिल प्रभू यांनी मी हरकत हा शब्द मागे घेतो असे जाहिर करत पाँईट ऑफ इर्न्फामेशन खाली म्हणत असल्याचे सांगत विधान भवन परिसरात असताना कोणत्याही पक्षाचा आमदार असो त्यास परिसरात वावरताना काही प्रमाणात निर्बंध असावेत अशी अपेक्षा केली. जेणेकरून प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल आणि त्यातून जनतेमध्ये चांगला संदेश जाईल. त्यामुळे अध्यक्षांनी यासंदर्भात निर्णय द्यावा अशी मागणी केली.

हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रभू यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार कोणत्याही पक्षाचा नेता असो किंवा आमदार असो त्यांची नक्कल करणे, त्या अनुषंगाने भाष्य करणे हे सर्वांनीच टाळायला हवे. तरच प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि सर्व पक्षिय आमदारांनी पाळायला हवे आणि तशी समज प्रत्येकाला द्यावी असे मत मांडले.

तर सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात बोलताना म्हणाले की, विधानसभेत घडणाऱ्या गोष्टीं पाहून आज काल स्थानिक पातळीवरही त्या अनुषशंगाने घटना घडत आहेत. त्यामुळे खालीही आमदारांचा मान-सन्मान राखला जात नाही. यापार्श्वभूमीवर एक आमदारांची समिती स्थापन करावी जेणे करून आमदारांच्या वर्तनाबाबत एक नियमावली करणे सोपे जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी आणि मंत्र्यांनी विधान भवन परिसरात असताना एकमेकांचा सन्मान राखवा असे सांगत विधान भवनाच्या बाहेर काय करायचे ते करा, त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही असे स्पष्ट करत एकप्रकारे भाजपाच्या त्या आमदाराला अप्रत्यक्ष समज दिली.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *