Breaking News

मनसेवर आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा म्हणाले, स्टंटबाजी आणि संपलेल्यांवर बोलत नाही शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा मनसेने लावली

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेने भाजपाची भूमिका स्विकारल्यानंतर भोंगे न काढणाऱ्या मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. आज राम नवमीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला डिवचत शिवसेना भवनासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावली. त्यामुळे पोलिसांनी मनसेचे भोंगे जप्त करत मनसैनिकांना ताब्यात घेतले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर देताना दुसऱ्यांदा म्हणाले, स्टंटबाजी करणाऱ्या आणि संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही.

मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आदित्य ठाकरेंना प्रसारमाध्यमांनी मनसेच्या शिवसेनाभवनासमोर लावण्यात आलेल्या भोंग्याबद्दल विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत असेही ते म्हणाले.

मनसेकडून “शिवसेना भवन मस्जिद आहे का? असा प्रश्न करण्यात आलाय” अशी विचारणा पत्रकारांनी करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर खोचक टोला लगावत म्हणाले की, संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही.

आज रामनवमीच्या निमित्ताने सकाळीच मनसेनं शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालिसा लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व सोडून दिलं. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात अशा खोचक शब्दांत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेला आवाहन केलं. यानंतर किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून अशाच प्रकारे भोंग्यांवर हनुमान चालिसा वाजवली गेली.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या खोचक टीपण्णीवर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आमचा पक्ष संपला की नाही हे आगामी निवडणूकीत दिसेलच. पण एक मात्र सांगतो की शिवसेनेचं हिंदूत्व संपले आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *