Breaking News

सत्तांतरानंतर सही होताच मोदी सरकारने काढली बुलेट ट्रेनच्या कामाची निविदा बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाची निविदा जाहीर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्य सरकार स्थापन केले. या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी लागणाऱ्या बीकेसीतील जागेच्या हस्तांतरणावरसह सर्व कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्या केल्या आहे. त्यानंतर या गोष्टीला आठ दिवसही उलटत नाही, तोच मोदी सरकारने या भूमिगत स्टेशनच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या आहेत.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)ने शुक्रवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भूमिगत स्टेशन बांधण्याच्या उद्देशाने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल सर्किटसाठी निविदा मागवल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील हे एकमेव भूमिगत स्टेशन असेल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, मुंबई भूमिगत स्थानक आणि बुलेट ट्रेनसाठी बोगद्याच्या डिझाइन आणि बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. NHSRCL ही बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे, ज्या अंतर्गत अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर ट्रेन ३२० किमी प्रतितास वेगाने धावतील. ही ट्रेन ५०८ ​​किमी अंतर कापणार असून तिच्या मार्गावर १२ स्थानके असतील. रेल्वेने दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या सहा तासांवरून तीन तासांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

बुटेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १.०८ लाख कोटी रुपये आहे आणि शेअरहोल्डिंग फ्रेमवर्कनुसार, NHSRCL ला केंद्र सरकारकडून १० हजार कोटी रुपये, तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना प्रत्येकी पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याजाने भरायची आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत फुकाहोरी यासुकाता यांची भेट घेतली. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) द्वारे अर्थसहाय्यित बुलेट ट्रेनसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी वेळी दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *