Breaking News

अदानीमधील २० हजार कोटी कुणाचे ? राहुल गांधी यांचे वर्ड पझल मधून उत्तर काँग्रेस सोडून गेलेल्या पाच जणांचे संबध जोडत साधला निशाणा

हिंडेनबर्ग संस्थेचा अहवाल बाहेर आल्यानंतर उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबधावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धारेवर धरण्यास सुरवात केली. त्यातच मोदी आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हा प्रश्न विचारल्याप्रकरणी राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं. असं असलं तरीही राहुल गांधी हे काही गौतम अदानी यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीत. शरद पवार यांनीही अदानींच्या मुद्द्यावर जास्तच गदारोळ झाला हे म्हटलं आहे. तसंच नावही माहित नसलेल्या कंपनीच्या अहवालावरून इतका गदारोळ करणं योग्य नाही असं म्हणत राहुल गांधींचे कान टोचले. मात्र राहुल गांधी गौतम अदानींचा मुद्दा सोडायला तयार नाहीत. तसेच अदानी कंपनीत २० हजार कोटी रूपये कोणाचे यावरून सातत्याने सवाल करणाऱ्या राहुल गांधी यांनी ट्विट करून एक वर्ड पझल मधून त्या २० हजार कोटी रूपयांच्या गुंतवणूकदारांचे नावही सांगण्याचा प्रयत्न केला.

हे लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. त्यामध्ये त्यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांची नावं लिहिली आहेत. त्या नावांमधून बरोबर अदानी हे नाव कसं समोर येतं हे या वर्ड पझलमध्ये दाखवलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

गुलाम नबी आझाद यांनी २०२२ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे त्यामध्ये त्यांनी आपण राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्ष सोडल्याचं म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या वर्ड पझलमध्ये पहिलं नाव आहे ते आझाद यांचं.

त्यानंतर अदानी मधल्या डी या अक्षरासाठी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आडनावाचा वापर केला आहे. खरंतर शिंदे कुटुंब हे पक्के काँग्रेसी होते. तसंच ज्योतिरादित्यांचे वडील आणि राजीव गांधी यांची खास मैत्री होती. मात्र २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपात गेले. त्यानंतर आता राहुल गांधींनी वर्ड पझलच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं आहे.

किरण कुमार रेड्डी हे देखील काँग्रेसमध्ये होते. आंध्र प्रदेशचे ते माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला आणि राहुल गांधींनी त्यांच्या नावाचा वापर अदानी ही अक्षरं जुळवण्यासाठी केला आहे.

हिमंता बिस्वा सरमा हे कायमच काँग्रेसवर आणि खास करून राहुल गांधींवर तुटून पडत असतात हे आपण पाहिलं आहेच. २०१५ मध्ये ते भाजपात आले आहेत. राहुल गांधींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे यांच्या नावाचा आधार घेत राहुल गांधींनी अदानी हे पझल जुळवलं आहे.

त्यापुढंचं नाव आहे ते अनिल अँटनी यांचं. अनिल अँटनी यांनी नुकताच भाजपात प्रवेश करत काँग्रेसला दे धक्का दिला. ए. के. अँटनी यांचे ते सुपुत्र आहेत. ADANI हे पूर्ण आडनाव जुळवण्याठी शेवटचं नाव अनिल अँटनी यांचं लिहिण्यात आलं आहे. या वर्ड पझल ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *