Breaking News

राष्ट्रवादीचा ईडीला सवाल, मलिकांच्या आरोपपत्रात आकडे चुकलेच कसे? हसीना पारकर हिला ५५ नाही तर ५ लाख दिले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण हसीना पारकर हिला कुर्ला येथील जमिन खरेदी करताना ५५ लाख रूपये दिल्याचा उल्लेख करण्यात आला. परंतु ती चुक ईडीच्या लक्षात आल्यानंतर त्यात दुरूस्ती करत ५५ लाख नाही तर ५ लाख दिल्याचे दुरूस्ती पत्रक आज न्यायालयात सादर केले. त्याची प्रत सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मलिकांवरील आरोप पत्रात आकडे चुकलेच कसे असा सवाल ईडाला केला.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुणावली होती. मात्र आज त्यात आणखी वाढ करत विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी वाढविली आहे.
यावेळी सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड अर्जातून नवीन माहिती समोर आली आहे. मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचा ईडीचा दावा चुकीचा होता, असे स्वतः ईडीने रिमांड अर्जात म्हटले आहे. त्यामुळे आता ईडीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला ५५ लाख दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केला होता. मात्र ईडीने कोर्टात फक्त पाच लाख म्हटल्याने देवेंद्र फडणवीस हे निराधार आरोप करत होते हे सिध्द होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.
दाऊदची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये मलिक यांनी दिल्याचा दावा ईडीने यापूर्वीच्या रिमांड अर्जात केला होता. त्याद्वारे टेरर फंडिंगचा आरोप देखील ईडीने केला होता. परंतु गुरुवारी ईडीने नवीन रिमांड अर्ज दाखल केला असून हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिले ही टायपोग्राफीची चूक होती, ते पाच लाख रुपये आहे, असे वाचावे असे आपल्या सुधारीत अर्जात म्हटले.
ईडीतर्फे युक्तीवाद करणाऱ्या अनिल सिंह यांनी रिमांड अर्जातील माहिती वाचून दाखवली. पण, ५ लाख रुपये नाहीतर १ रुपया जरी टेरर फंडींगमध्ये वापरला असेल तर तो गुन्हा आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची ईडी कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला.
आज ईडीने न्यायालयाला मागील रिमांड याचिकेत टायपोग्राफिकल त्रुटी असल्याने कथित ५५ लाख फक्त ५ लाख म्हणून वाचले जावे असे म्हटले आहे. त्यामुळे यामध्ये कोणती रक्कम खरी आहे आणि ईडीने अशी चूक का केली हे फडणवीस यांनी आता स्पष्ट करावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली. येत्या काही दिवसात खरे चित्र समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *