Breaking News

फडणवीसांच्या “त्या” टीकेवर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, हा तर आवडता छंद ट्विट करून काही उपयोग नाही

गुढी पाडवा आणि त्यानंतर उत्तर सभेच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जाती-पातीचे राजकारण पवारांनी सुरु केल्याचा आरोप करत त्यामुळेच महाराष्ट्रात जाती-पातींमध्ये संघर्ष निर्माण झाल्याची टीका केली. राज ठाकरे यांच्या या टीकेच्या अनुशंगाने भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सलग १४ ट्विट करत शरद पवार यांच्या मुस्लिम समुदायाशी संबधित लांगुलचांगल करण्याच्या राजकारणावर टीका केली.

यावेळी ट्विट करताना फडणवीसांनी ३७० कलम हटविण्यावरून शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेपासून ते आझाद मैदानावरील रझा अकादमीने काढलेल्या मोर्चा दरम्यान झालेल्या तोडफोड, काश्मीर फाईल्स चित्रपट, नवाब मलिक यांच्या अटकेवरून केलेले वक्तव्य, २०१३ अटक करण्यात आलेली इशरत जहाँ हिच्याबाबत केलेले वक्तव्य ते १९९३ ला राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना १२ बॉम्बस्फोट झालेले असताना पवारांनी १३ स्फोट झाल्याचे सांगणे यासह अनेक गोष्टींवरून शरद पवारांवर टीका केली. तसेच अशा पध्दतीचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण पवारांचे स्विकारण्या योग्य नसल्याची टीकाही केली. फडणवीसांनी केलेल्या या टीकेवरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, हा तर काहीजणांचा आवडता छंद झाला असल्याची खोचक टीका केली.

तसेच शरद पवारांच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या भूमिका वर्षानुवर्षे लोकांना माहिती असल्याचेही सांगत या अशा प्रकारे ट्विट करून काही फायदा होईल असे मला वाटत नसल्याचे सांगत फडणवीसांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध जोडल्यावरून देखील वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी देखील अशाच प्रकारे प्रयत्न झाले. नवाब मलिक यांची केस पीएमएलए कायदा येण्यापूर्वीची आहे. इतकी जुनी केस काढून दाऊदशी कोणताही संबंध नसताना ओढून-ताणून संबंध जोडायचा हा प्रकार आहे. या पूर्वीही शरद पवारांशी असा संबंध जोडायचा प्रयत्न भाजपानं केला होता. मला त्यात काही तथ्य दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांवर टीका करणं हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाला आहे. शरद पवार यांच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या भूमिका वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहेत. अशा प्रकारचे ट्वीट करून त्यात काही फायदा होईल, असं मला वाटत नाही असेही ते म्हणाले.

Check Also

बावनकुळेंच्या मिशनला अमोल कोल्हे यांचे प्रत्युत्तर, बोललं म्हणून फारसा फरक पडत नाही.. सुप्रिया सुळे यांचे काम बोलतं

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published.