Breaking News

पवार पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पडळकरांना टोला

काही दिवसांपूर्वी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारांनी भर पावसात भाषण केले. पण संख्या ५४ जणच निवडूण आले. मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री का नाही बसावला असा सवाल करत कितीही केले तरी राष्ट्रवादीची ताकद ५४ च्या पुढे जात नसल्याची टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युतर देत म्हणाले की, शरद पवार हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपाला झाला असा उपरोधिक टोला गोपीचंद पडळकर यांना लगावला.

उठसूठ पवारसाहेबांवर बोलणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला.

भाजपाला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही. हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो. साताऱ्यातील पावसाळी सभेत पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत याची आठवणही  त्यांनी करुन दिली.

शरद पवार नाव घेतल्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे, आणि म्हणूनच वारंवार शरद पवारांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड पडळकरांची सुरू असल्याची टोलाही त्यांनी यावेळी लागवला.

‘भूतकाळ’ खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते पूरातत्व शास्त्रज्ञांसारखे कठोर परिश्रम करतायत – क्लाईड क्रास्टो

पूरातत्व शास्त्रज्ञांसारखे ‘भूतकाळ’ खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते कठोर परिश्रम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला.

सत्ता टिकवण्यासाठी भाजपा अनेक जुनी प्रकरणे उकरून काढून देशातील वातावरण कलुषित करण्याचे काम करत आहे. आताच ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमावरुन भाजपा राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, भाजपा सध्या पूरातत्व विभागासारखे दिसू लागली आहे. पूरातत्व विभाग ज्याप्रमाणे खोदकाम करून अनेक जुन्या गोष्टी काढतात तशापध्दतीने भाजपा कामाला लागले असल्याचा टीका क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केला.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, ठाणे तालुक्यातील ‘या’ १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार …

Leave a Reply

Your email address will not be published.