Breaking News

रथाच्या तोडफोडीवरून फडणवीस म्हणाले, यात्रा थांबणार नाही ती सुरुच राहणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पोलखोल यात्रा भाजपाने सुरु केली. परंतु चेंबूरमध्ये या रथयात्रेचे उद्घाटन होण्यापूर्वीच पोल-खोल यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, पहिल्या सभेने विरोधक हादरले आहेत. मात्र आमची यात्रा थांबणार नसून ती सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला.
पुण्यात भाजपाः काल आज आणि उद्या या पुस्तक प्रकाशनासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
पोल खोल रथ यात्रेचे उद्घाटन चेंबूर येथे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी सदर रथ यात्रेच्या रथाच्या समोरील बाजूस असलेली काच फोडण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे दरेकर यांनी यासंदर्भात चेंबूर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली.
यासंदर्भात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पहिल्या जाहीर सभेनंतर ते हादरले आहेत. त्यामुळे अशा पध्दतीची तोडफोड त्यांनी सुरु केली आहे. परंतु आम्ही घाबरणार नाही. तसेच महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत राहणार आहे. तसेच ही यात्रा बंद करणार नसून ही यात्रा अशीच यापुढे सुरुच ठेवण्यात येणार आहे. तसेच महाविकासाचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढतच राहु असा इशाराही त्यांनी दिला.
त्याचबरोबर अशा पध्दतीचा हल्ला होणं अपेक्षितच होते असेही त्यांनी सांगितले.
तसेच असा हल्ला करून रथाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केली.

शिवसेने विरोधात पोल खोल रथ यात्रा –

आगामी महगापालिका निवडणूकीच्या धर्तीवर मुंबईतील भ्रष्टाचारी कामाची पोलखोल करण्यासाठी भाजपाकडून मुंबईतील जवळपास १५० हून अधिक वार्डांमध्ये पोलखोल रथ यात्रा काढण्यात येत आहे. आज या रथ यात्रेची सुरूवात चेंबूर येथे होणार होती. परंतु तत्पूर्वी काही अज्ञातांनी या रथावर दगडफेक करून गाडीची काच फोडण्यात आली. त्यामुळे या अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात चेंबूर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.