Breaking News

“त्या” आरोपावरून मलिकांवर भाजपा नेत्यांकडून टीकेचा भडीमार वानखेडेच्या पोस्टींगसाठी भाजपा नेत्याचे दिल्लीत लॉबींग- मलिकांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली मुंबईतून होवू नये यासाठी भाजपातील एक बडा नेता दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयात लॉबींग करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जून्या केसेसमधील पंचावर जबाब बदलण्यासाठी एनसीबीकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मलिक यांच्या या आरोपानंतर भाजपा नेत्यांनी मलिक यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर देणे गरजेचे नसल्याचे मत व्यक्त करत भाजपा अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसल्याचे स्पष्ट केले.

तर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले की, पंच सुखानी याला फोडण्यासाठी नवाब मलिक यांनी त्यास ३० लाखाची लाच देत इथे तुझ्या जीवाला धोका असल्याची धमकी दिल्याचा प्रत्यारोप केला. तसेच केवळ आपल्या जावयाला वाचविण्यासाठी मलिक हे शासकिय यंत्रणांचा वापर करून पंचाना धमकावत असल्याचा आरोप केला.

केवळ जावयाला वाचविण्यासाठीच ते केंद्रीय एजन्सीला आणि त्या यंत्रणातील अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा कट आखत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर दरम्यान, अतुल भातखळकर यांनी समीर वानखेडे याच्या पोस्टींगसाठी केंद्रीय गृह मंत्रालयात लॉबींग करायला ते काय महाविकास आघाडीचे सरकार आहे का ? असा खोचक टोला मलिक यांना लगावत लॉबींग करून पोस्टींग करण्याचा तिथे चालत नसल्याची सारवासावरही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, एनसीबीने मलिक यांचे जावई समीर खान यास सेशन न्यायालयाने दिलेल्या जामीनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत खान याला जामीन देताना सेशन न्यायालयाने एनसीबीने दिलेल्या सर्व कागदपत्रांकडे नीटसे पाह्यले नाही. त्यामुळे समीर खान यास दिलेल्या जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच हस्तगत करण्यात आलेल्या मालाविषयीचा अंतिम अहवालात नशेचे पदार्थ असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्याचा साठाही मुबलक प्रमाणात अर्थात व्यावसायिक इतका असल्याचा दावाही या याचिकेच्या माध्यमातून एनसीबीने न्यायालयात केला आहे. एनसीबीच्या या याचिकेवर लवकरच सुणावनी होणार आहे.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *