Breaking News

गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, ईडी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू करणार चौकशी - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) नेमून चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगत ही एसआयटी अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या एसआयटीला तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
संजय राऊत यांच्या पत्नी आणि इतरांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अलीकडच्या काळामध्ये भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाहीय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही त्यांनी सांगितले.
नाशिकच्या पोलिस आयुक्त पत्र प्रकरणावर बोलताना सदर गोष्ट त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली पाहिजे असे सांगितले. विरोधकांच्या मंदिरांवरून स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याच्या प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलिस प्रशासन घेईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता मुंबई पोलिस ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई पोलिस विरूध्द ईडी असा संघर्ष निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मात्र या निमित्ताने दोन यंत्रणा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट झाले.

Check Also

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे ही नसे थोडके गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फडणवीसांना टोला

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published.