Breaking News

सलग तिसऱ्या दिवशी डिझेल तर पेट्रोलच्या दरात २२ दिवसांनी वाढ पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महाग

मुंबई: प्रतिनिधी

मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी डिझेल महागले आहे. तसंच २२ दिवसांनी पेट्रोलचे दर बदलले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी आणि पेट्रोलचे दर २० पैशांनी वाढवले आहेत. आता दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये आणि डिझेल ८९.५७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणून, ब्रेंट क्रूडचा दर शनिवारी ७८ डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडून ७९.३६ डॉलरवर पोहोचला. कच्चे तेल ३ वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये ते ८० डॉलरपर्यंत पोहोचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. या वर्षी आतापर्यंत पेट्रोल १७.४२ रुपयांनी आणि डिझेल १५.४५ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारीला पेट्रोल ८३.९७ रुपये आणि डिझेल ७४.१२ रुपये प्रति लीटर होते. आता ते १०१.३९ आणि ८९.५७ रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल १७.२४ रुपयांनी आणि डिझेल १५.४५ रुपयांनी महाग झाले आहे.

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओरिसा, केरळ, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर जम्मू -काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे आहे. डिझेलचा दर ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी १०० रुपये प्रति लिटरच्या वर आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात.

तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या ग्राहकाला आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड 9224992249 आणि बीपीसीएल ग्राहकाला 9223112222 या क्रमांकावर आरएसपी लिहून पाठवावा लागेल. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर ‘HPPrice’ पाठवून आजची किंमत जाणून घेऊ शकतात.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *