Breaking News

यशस्वी शिष्टाईनंतर शरद पवार म्हणाले…तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होतील ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावे मात्र माझ्यासाठी प्रश्न सुटणे महत्वाचे

मराठी ई-बातम्या टीम

दोन महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचे सुरु झालेले आंदोलन अखेर संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याप्रकरणी यशस्वी शिष्टाई केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या कृती समितीने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत सदावर्ते यांना वकिल म्हणून नियुक्त करून चुक झाल्याची कबुलीही या संघटनांच्या नेत्यांनी दिल्यानंतर सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील असे आश्वासन दिले.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे राज्यभरातील प्रवाशी प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचं वर्णन न केलेलं बरं त्यातच कोरोनाचा ओमायक्रॉन नावाचा करोनाचा नवीन अवतार आल्याने देशावर आणि राज्यावर संकट आलेय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्यातील अर्थकारणावर होतोय. त्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागतीय असेही ते म्हणाले.

कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्न कृती समितीने सरकारच्या नजरेत आणून दिलेत. त्याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे प्रयत्न असतील, एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर यायला पाहिजे, तुमच्या इतर प्रश्नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी कृती समितीला दिली.

कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलंय, ही आनंदाची बाब आहे. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील. तर एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा प्रवाशांचाही विचार करावा. एसटी संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पण काहींनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला. सरकार एसटी कर्मचाऱ्याचे म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज पसरवला गेला. मला इथं राजकारण करायचं नाही. मला प्रश्न सोडवायचा आहे. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, माझ्यासाठी हा प्रश्न सुटणे जास्त महत्त्वाचे आहे. काहींना याबाबत गैरसमज पसरवले आहेत. मात्र ज्यांनी दिशाभूल केली त्यामुळेच हा संप चिघळला गेल्याचा टोलाही पवार यांनी अॅड.गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता लगावला.

सरकार एसटी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. पण एसटी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार आहे. एसटी रस्त्यावर धावली पाहिजे. एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही. एसटी कामगार संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेतून निश्चित तोडगा निघेल आणि सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न चर्चेतून सोडवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एसटी संपामुळे दोन महिने प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन त्यांच्यावरील कारवाईबाबतचा लढा द्यायला हवा होता, त्यातून निश्चितच मार्गही निघाला असता. मला आनंद आहे कृती समितीच्या संघटना प्रतिनिधींनी कामगारांच्या हिताबद्दलच जितकी आस्था आहे, त्यासोबत प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याही बद्दल कामगार संघटनांच्या लोकांचा आग्रह आहे. त्यामुळे त्यांचाही एकंदर दृष्टीकोन सकारात्मक आहे. या सकारात्मक दृष्टीकोनातूनच त्यांनी महाराष्ट्रभरातील एसटी कामगारांना आवाहन केलंय. माझी विनंती आहे, शेवटी आपली बांधिकली प्रवाशांशी आहे. ही बांधिकली जपली पाहिजे. याबाबत गांभीर्यानं विचार करत एसटी कशी सुरु होईल, याबाबत काळजी घ्यावी, एवढंच मला सुचवायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *