Breaking News

नितीशकुमार यांनी घेतली आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ महागठबंधन सरकारमध्ये आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद हा पक्षासोबत महागठबंधन करून बिहारमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून महागठबंधन केले. यामध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या आमदारांच्या पाठींब्याचे पत्र त्यांनी काल (९ ऑगस्ट) राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.

महागठबंधनचे सरकार स्थापन करण्याआधी नितीशकुमार यांनी भाजपासोबतची युती तोडली. दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि नितीशकुमार (जेडीयू पक्ष) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एसजेडी आणि भाजपा यांच्यात वाद सुरू होता. हा वाद काही दिवसांपासून शिगेला पोहचला होता. अखेर नितीशकुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजद पक्षाला सोबत घेऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला.

महागठबंधन सरकारचा शपथविधी घेत असताना स्थानिक पातळीवर राज्यातील भाजपाकडून नितीनशकुमार यांच्या विरोधात आंदोलन करत होते. तसेच राज्यभरात धोकेबाज नितीनकुमार अशा घोषणाही देण्यात येत होते.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *