Breaking News

शिंदे गटाला टोला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले, टेंम्पो-ट्रक कमी पडले पाहिजेत… निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी शपथपत्र आणि सदस्य पत्र वाढविण्याचे आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीचे काम पुन्हा एकदा हाती घेत नव्याने पक्ष उभारणीच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक समर्थकाला जास्तीत जास्त सदस्य झाल्याचे नवे पत्र आणि शपथ पत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या वाहतूक शाखेकडून नवीन सदस्य नोंदणी करण्यात आली. वाहतूक सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत ११ हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले, सदस्य पत्र आणि शपथ पत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजेत इतकी सदस्य संख्या वाढवा असे आवाहन केले.

सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत असा टोला शिंदे गटाला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले, जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन सदस्यांचे सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे. नवीन सदस्य नोंदणीसाठी काम करणाऱ्या वाहतूक सेनेचंही त्यांनी यावेळी आभार मानले आहेत.

शिंदे गटातील नेत्यांना टोला लगावताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लढण्याचा एक काळ असतो, वाहतूक सेना म्हटल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची सवय असते. रस्त्यात खड्डे असतात तरीही आपल्याला तो रस्ता पार करायचा असतो. हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडलेत, त्याचं काय करायचं? हे आपण उद्या बघू असेही म्हणाले.

Check Also

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *