Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपाचा सवाल, “आदित्यजी आता तुम्हीच सांगा कोण खरे?” भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे ट्विट सादर केले

मराठी ई-बातम्या टीम

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईकरांना नवं वर्षाची भेट देत ५०० चौरस फुटाच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्यांनीच केलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत खरे कोण? तुम्ही की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे? असा खोचक सवाल करत फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षे का केली नाही? असा तिरकसही सवालही केला.

केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्विटमध्ये फडणवीस सरकारने घेतलेल्या त्या निर्णयाचे स्वागत दस्तुरखुद्द आदित्य ठाकरे यांनी करत त्याबद्दल फडणवीस सरकारचे आभारही मानले होते. ते ट्विटच त्यांनी रिट्विट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयावरून आता नव्या राजकिय श्रेयवादाच्या वादंगाला तोंड फुटणार असल्याची शक्यता निर्माण झाले आहे.

तसेच लोकांना वचन देवून फसविणारे अनेक आहेत असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाला लगावला होता. त्यावर केशव उपाध्ये यांनी यात अग्रस्थानी आपलेच नाव येणार कारण आपण २०१९ विधानसभेच्या निवडणूकीत काय भाषणे केली आठवत असतीलच. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार भाषण करीत युतीच वचन लोकांना दिल आणि सत्तेसाठी याच महाराष्ट्रातील लोकांना फसवल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांना ट्विट करत करून दिली.

त्याचबरोबर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात आपला एक व्हिडिओ शेअर करत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केलेल्या घोषणेचा उल्लेख वचनपूर्ती असा केला आहे. मात्र ही वचनपूर्ती आहे तर त्याला पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे का लागली असा सवाल करत हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदारांनी यासंदर्भातील सवाल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याची टीका केली.

जोपर्यत महापालिकांच्या बिलामध्ये शुन्य शुन्य असे लिहून येत नाही तोपर्यंत आम्ही वचनपूर्ती झाली असे म्हणणार नाही आणि तुम्ही वचन पूर्ती केली नाही असेच आम्ही समजू असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *