Breaking News

७७ वर्षानंतर या गावात पहिल्यांदाच धावली एसटी आणि जोडलो छत्तीसगडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीला दाखवला हिरवा झेंडाः नक्षलवादीही आले शरण

देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७७ वर्षे झाली. या ७७ वर्षात राज्यात गडचिरोलीतील अहेरी-गर्देवाडा दरम्यान राज्य सरकारची एसटी बस धावली नव्हती. मात्र या ७७ वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली ते छत्तीसगडला जोडल्या जाणाऱ्या एसटी बस ला हिरवा झेंडा दाखवित पहिली एसटी बस प्रवाशी वाहतूक सेवा सुरु केली. यावेळी काही नक्षलवादी चळवळीतील नक्षलींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पणही केले.

या जिल्ह्यातून पहिल्यांदा एसटी बस सेवा सुरु झाल्याने या भागातील नक्षलवादी चळवळीचा प्रभाव कमी होऊन राज्य सरकारचा प्रभाव वाढल्याचे दिसून येत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दौरा विषेश आहे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात पहिल्यांदाच अहेरी-गर्देवाडा दरम्यान पहिल्यांदा एसटी बस धावली. या बसच उद्धाटन मी केलं. पेनगेंड्याला नवीन आऊटपोस्ट तयार करून एक प्रकारे गडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगडशी जोडण्याचं काम सुरु केलं. ज्या भागात माओवाद्यांचा मोठा प्रभाव होता तिथे आता सरकारचा आपला प्रभाव तयार झाला असल्याचंही यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळ्या ठिकाणी आणि सगळ्या लोकांनी आता माओवाद्यांना नाकारलंय, १२ गावांनी ठराव करून माओवाद्यांना ओळख देण्याचं नाकारलं आहे. त्यांनी दिलेले ओळखपत्र पोलिसांत जमा आहे. या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात नवी पहाट येऊ लागली आहे. याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका हा जिल्ह्या महाराष्ट्राचे प्रवेशद्वार किंवा पहिला जिल्हा म्हणा कारण तसं काम आम्ही सुरु केल्याचंही यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, कोनसरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी केलं होतं. आता त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन-भूमिपूजन मी करतोय. यातून १० हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच आणखी १० महिन्यानंतर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ५ हजार लोकांना रोजगार मिळणार असून गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील ४ वर्षात गडचिरोलीतील एक युवती किंवा युवक नक्षलवादी संघटनेत सहभागी झाले नाहीत. नक्षलवादापेक्षा लोकांचा भारतीय संविधानावर विश्वास वाढत चालला असल्याचं आता हळूहळू स्पष्ट होत असल्याचंही यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *