आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्या दरम्यान २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. त्यातील फक्त १ कंपनी परदेशी आहे, उर्वरित २८ कंपन्यांचे मुख्यालय भारतात आहे. विशेष म्हणजे, ह्यातील २० कंपन्या महाराष्ट्रात असून, त्यातील १५ कंपन्या मुंबईतल्या मुख्यमंत्री कार्यालया जवळच्याच आहेत. हे लक्षात घेता प्रश्न निर्माण होतो की, या कंपन्यांना सामंजस्य करार करण्यासाठी दावोसला का नेण्यात आले? असा सवालही यावेळी केला.
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, दावोसमधील वेळ आंतरराष्ट्रीय नेते, कंपन्या आणि तेथील उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी वापरता आला असता. दावोस हे जागतिक स्तरावर संबंध निर्माण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. जेथे अनेक प्रतिभावान व्यक्ती आणि विविध संस्था एकत्र येतात. अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी जगाशी संवाद साधण्याऐवजी मुख्यमंत्री राज्यातील, देशातीलच कंपन्यांमध्ये गुंतून राहण्यात काय फायदा? इतर कंपन्यांशी संपर्क करा. जागतिक घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी तेथील सर्वोत्तम सेशन्सना उपस्थित रहा अशी सूचनाही यावेळी केली.
दावोस दौऱ्यातल्या करारामध्ये एवढ्या कंपन्या भारतातल्या आहेत तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला ?
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम महाराष्ट्रातच का घेता आला नाही ? तो २०२२ च्या मध्यापासून झालेला नाही. हे सामंजस्य करार महाराष्ट्रातच पार पाडून जागतिक कंपन्यांना आपल्याकडे बोलावणे, उचित ठरले असते. मुख्यमंत्र्यांनी असे सामंजस्य करार आपल्या राज्यात आयोजित करून जगाशी दावोससारख्या व्यासपीठावर संपर्क साधावा, अशी विनंतीही यावेळी केली.
गंमत अशी की, अख्ख नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला, मंत्री रुसून गावी! आणि त्याच गँगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला नेले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्री यांनी केले. नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला. त्यांना निमंत्रण होतं कीं नाही? त्यांना सोबत का नेलं नाही? ती नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसतीये. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांच्या आधी उद्योग मंत्री पोहचायला हवेत. ते मुख्यमंत्री यांच्या नंतर गेले. बरं निघताना सुद्धा उद्योग मंत्री आधी निघाले. का नाराज होते मिंदे म्हणून? उद्योग मंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबता मात्र उद्योग मंत्री थांबू शकत नाही? असो, गंमत अशी आहे की, अख्ख नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला, मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला नेलेत असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
Being always supportive of any real investment/ proposed investment coming into our nation and our state, this Davos trip of CM Fadnavis ji seems to be totally misaligned by his office.
Out of the MoUs for proposed investment signed with 29 companies, only 1 is from outside of… pic.twitter.com/ZvY1FdUHyR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 23, 2025