Breaking News

मुख्यमंत्री शिंदे आणि शेतकरी-कष्टकऱ्यांचा एकमेकांना सोमवारपर्यंतचा अल्टीमेटम विधिमंडळात घोषणा केल्यानंतरच आंदोलनाबाबत घोषणा करू अन्यथा

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशानावर नाशिक ते विधानभवनापर्यंत लॉग मार्च काढण्यात आला. हा मोर्चा सध्या मुंबईची वेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिंद येथे पोहोचला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉंग मार्चचे नेते तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदारांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतरच आणि त्याची अधिकृत घोषणा विधिमंडळात केल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांच्यावतीने देण्यात आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या मागण्या मान्य करू पण आंदोलन मागे घ्या अशी मागणी केली. यावरून सोमवार पर्यंत अधिकृत भूमिका सादर करण्याचा अल्टीमेट राज्य सरकार आणि मोर्चेकऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १४ मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे किसान सभा उद्या मोर्चा मागे घेणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली. पण किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण मोर्चा मागे घेणार नसून वाशिम येथे थांबून मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहणार असल्याचं सांगितलं. तसेच अंमलबजावणी होत नसल्याचं लक्षात आल्यास पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेला यायला निघेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते जीवा पांडू गावित यांनी इशारा दिला.

जीवा पाडूं गावित पुढे बोलताना म्हणाले, आमच्या मागण्यांवर बरीच चर्चा झाली. आमच्या मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय झाले आहेत. मागच्या दोन मोर्चांचा अनुभव घेता जे आश्वासन दिलं जातं ते पाळलं जात नाही किंवा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. आमच्या १७ ते १८ मागण्या या विचाराधीन आहेत. केंद्राच्या मागण्या चर्चेत आहेत. पण महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरच्या मागणींवर सकारात्मक चर्चा झालीय. आमचा लाँग मार्च मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय पुढे चालत राहणार, असा निश्चय घेऊन आम्ही आलो आहोत असेही म्हणाले.

जीवा पांडू गावित म्हणाले, सरकारने आम्हाला मोर्चा स्थगित करण्याचं आवाहन केलं. आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात जीआर बनवून कलेक्टरकडे पाठवा आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली की आमचं आंदोलन मागे घेऊ. आम्ही फक्त आज थांबतोय. पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. दोन दिवसात आदेश तळापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली अशी माहिती घरच्या लोकांकडून निरोप आल्यानंतर आम्ही लाँग मोर्चा मागे घेऊ. पण यात दिरंगाई झाली आणि अंमलबजावणी झाली नाही तर तो लाँगमोर्चा मुंबईच्या दिशेला येईल, असा इशारा दिला.

आम्ही मुंबईत आलो तर लोकांना तकलीफ होईल. ही गोष्ट आम्ही सरकारला निक्षूणपणे सांगितली आहे. आम्ही आजच्यापुरता आंदोलन थांबवत आहोत. आमचा मोर्चा तूर्त थांबलेला आहे. वाशिम नावाच्या गावात आम्ही थांबणार आहोत. जोपर्यंत निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, सरकारची यंत्रणा तालुका पातळीवर काम करणार नाही. तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाहीत. ज्यादिवसी अंमलबजावणी होत नाही हे दिसेल त्यादिवशी आमचा मोर्चा पुन्हा मुंबईच्या दिशेला निघेल, असा इशारा त्यांनी दिला.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *