Breaking News

नाना पटोंलेनी केले भाकित, व्हॅलेंनटाईनच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार १४ फेब्रुवारीला न्यायालयात १६ आमदार अपात्र ठरणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची कायदेशीर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. मात्र उध्दव ठाकरे गटाने या प्रकरणाची ५ सदस्यीय खंडपीठाऐवजी ७ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ५ सदस्यांचे घटनापीठ पुढील सुनावणी घेणार की सात सदस्यीय घटनापीठाकडे याचिका वर्ग करणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १४ फेब्रुवारी रोजी व्हँलेनटाईन दिवस असून त्या दिवशी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार असल्याचे भाकित केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या भाकितामुळे आता संजय राऊत यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? अशी उत्सुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आले होते. त्यावेळी त्यांनी वरील भाकित केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात चाललेले शिंदे आणि फडणवीसांचे सरकारच असंवैधानिक आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. १४ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होईल. आम्हाला वाटते की त्या दिवशी निकाल लागेल. ते १६ आमदार अपात्र ठरतील. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असल्याचे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दल बोलताना म्हणाले, १९ फेब्रुवारीला येणारी शिवजयंतीदेखील राज्य सरकार पाहणार नाही, याचा आम्हाला विश्वास आहे. १९ फेब्रुवारीपूर्वी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे हे सरकार औटघटकेचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *