Breaking News

निवडणूक आयोगः ठाकरे-शिंदेच्या युक्तीवादानंतर ३० जानेवारीला पुढील सुनावणी सोमवारी लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश

शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे यावरून कायदेशीर लढाई शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु आहे. तसेच सध्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी सुनावणीच्या दिवशी ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांचा युक्तीवाद झाल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनविंदर सिंग यांनी युक्तीवाद केला. दोन्ही गटांचा युक्तीवाद आयोगाने ऐकल्यानंतर पुढील सुनावणी ३० जानेवारीला घेणार असल्याचे आयोगाने जाहिर केले.

तसेच सोमवारी लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला दिले.

त्यामुळे आता सोमवारी २३ जानेवारी रोजी शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला आपले म्हणणे सादर करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर ३० जानेवारीला शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र ठाकरे गटाकडून जो पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आयोगानेही अंतिम निर्णय देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मुदत २३ जानेवारी रोजीच संपत असल्याने ठाकरे गटाने पक्षातंर्गत निवडणूका घेण्यास परवानगी द्यावी किंवा अंतिम निकाल लागेपर्यंत उध्दव ठाकरे यांनाच शिवसेना पक्षप्रमुख पदावर राहण्यास मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीवर अद्याप निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख पदावर उध्दव ठाकरे हे जाणार की राहणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे २३ जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

१७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका यामागे पक्षाने मांडली होती. ती मान्यही झाली. २०१३ मध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली. २३ जानेवारी २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली. नेमकं या गोष्टीवर शिंदे गटाने बोट ठेवलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंनी तयार केलं आहे ते घटनाबाह्य आहे असा दावा मागच्या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता.

मागील जवळपास साडेतीन तासांपासून निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तीवाद सुरू होता. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा निर्णय अद्यापही गुढ आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *