Breaking News

काळ्या कपड्यातील आंदोलनावरील मोदींच्या टीकेला राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर काळे कपडे दिसले देशातली महागाई, बेरोजगारी दिसत नाही का?

नुकतेच काही दिवसांपूर्वी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून आंदोलन केले. या आंदोलनाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कितीही काळी जादू करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही अशी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानाचा समाचार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना चांगलेच प्रत्युत्तर देताना म्हणाले, नरेंद्र मोदींनी अंधश्रद्धेच्या गोष्टींचा उल्लेख करत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करु नये असा पलटवार केला.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील महागाई, बेराजगारी दिसत नाहीये का? असा खोचक सवालही राहुल गांधी यांनी करत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावू नका आणि देशाला काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्यं लपवू नका, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने ‘काळी वस्त्रे’ परिधान करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळी जादू’ असे केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील महागाई, बेराजगारी दिसत नाहीये का? अशी विचारणा राहुल गांधींनी केली आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावू नका आणि देशाला काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्यं लपवू नका, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले.

तुम्हाला लोकांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

पानिपत येथील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. काही जण सध्या खूप नैराश्यात आहेत. नैराश्य दूर करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी त्यांनी ‘काळी जादू’ केली, असं पंतप्रधान म्हणाले. त्यास ५ ऑगस्ट रोजी काँग्रेसने काळी वस्त्रे परिधान करून केलेल्या आंदोलनाचा संदर्भ होता.

काही लोकांनी ५ ऑगस्ट रोजी ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वाटते की काळी वस्त्रे परिधान केली तर आपल्या सर्व समस्या सुटतील, नैराश्य दूर होईल. पण जादूटोणा, काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेत गुंतून ते जनतेचा विश्वास मिळवू शकत नाही, सध्या तुमचे वाईट दिवस चालू आहेत. पण काळी जादू केल्याने तुमचे वाईट दिवस संपणार नाही, हे लक्षात असू द्या असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आम आदमी पक्षाच्या ‘मोफत’ धोरणाचाही पंतप्रधानांनी समाचार घेतला. जे मोफत देण्याचं वचन देतात, त्यांना नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधने कधीच सापडणार नाहीत. मोफत धोरण योग्य नसून दिशाभूल करणारं आहे. ते राष्ट्रहिताचं नाही तर राष्ट्राच्या विरोधात आहे. मोफत धोरणामुळे नवी गुंतवणूक होणार नसून हे धोरण राष्ट्राला मागे ढकलणारं असल्याची टीका केली.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *