Breaking News

राज्यातील १५० हून अधिक पोलिस आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू ३५९ पोलिस अधिकारी आणि २४१३ बाधित पोलिसांवर उपचार सुरु: गृहमंत्री

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९, नवी मुंबई २, ठाणे शहर १७, पुणे शहर ३, नागपूर शहर ५, नाशिक शहर २, अमरावती शहर १ wpc, औरंगाबाद शहर ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, पालघर २ व १ अधिकारी, रायगड ३, पुणे ग्रामीण २, सांगली १, सातारा २, कोल्हापूर १, सोलापूर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण ५, जळगाव  २, अहमदनगर ३, उस्मानाबाद १, बीड १, जालना १, बुलढाणा १, मुंबई रेल्वे ४, पुणे रेल्वे अधिकारी १, औरंगाबाद रेल्वे १, SRPF Gr 3 जालना-१, SRPF Gr 9 -१, SRPF Gr 11 नवी मुंबई १, SRPF Gr 4 -१अधिकारी, ए.टी.एस. १, PTS मरोळ अधिकारी १, SID मुंबई २ व १ अधिकारी अशा पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या ३५९ पोलीस अधिकारी व २४१३ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुपख यांनी दिली.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ४३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते २८ ऑगस्ट पर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ४३ हजार ९३४ गुन्हे नोंद झाले असून ३४ हजार ०१७ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी २३ कोटी ३६ लाख ४४ हजार ३९४ रु. दंड आकारण्यात आला. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख ०३ हजार ३२० पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३४० घटना घडल्या. त्यात ८९१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर- १ लाख ११ हजार  फोन

पोलीस विभागाचा१०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,११,१७१ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती त्यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,०६४ वाहने जप्त करण्यात आली.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *