Breaking News

मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरतेय नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण देशात महाआघाडी असावी अशी देशातील जनतेची भावना असून देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. तसेच सर्व पक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजप आणि आरएससच्या कारभाराच्या विरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे. या भावनेला जोडण्याचे काम कॉग्रेस करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. मनमोहन सिंह सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा दर प्रति बँलर १४० डॉलर प्रति बॅरल होता. आज त्याच बँरलचा दर आता ७० प्रति डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर कोसळूनही जनतेला त्याचा का फायदा होत नाही ? असा सवाल करुन आज दररोज पेट्रोल का महागतंय?  हा पैसा कुठं जातोय? गरिबाचे पैसे घेऊन १५-२० सर्वात श्रीमंताचे खिसे भरले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पेट्रोल -डिझेल जीएसटीमध्ये आणा अशी मागणी करत परंतु पंतप्रधानांना आमच्या या मागणीत इंटरेस्ट नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.

जीएसटी कराचे गब्बरसिंह टॅक्स असे नवे नाव ठेवून राहुल गांधी यांनी या करामुळे गरीब जनतेच्या खिशातुन निघालेला पैसै केवळ मुठभर श्रीमंताच्या खिशात जात असल्याचा आरोप केला. या गरीब दुकानदारांसाठी कॉग्रेस लढेल असे आश्वासन ही दिले. नोटबंदी केली, गब्बरसिंह टॅक्स लागू केला, त्यामुळे सर्व देशात नाराजी असल्याचे सांगत छोटा व्यापारी दु:खी आहे. त्यासाठीच आमची लढाई सुरु आहे, या लढाईत आम्ही यशस्वी होवू असा विश्वास ही व्यक्त केला. देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या प्रकारे मोदी आक्रमण करत आहेत ते थांबवण्याची गरज आहे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *