Breaking News

शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना लाभ

तर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

 मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज  गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून करण्यात आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील १ कोटी १ लाख ६ हजार ८८० शेतकऱ्यांना यांचा  लाभ होणार आहे. यासाठी २ हजार २१ करोड रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे.

या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी वर्षा निवासस्थान येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव डी.के.जैन, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १४ लाख २६ हजार ९२७ शेतकऱ्यांना २ हजार रूपयांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आला. बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ काही आठवड्यात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा या योजनेमध्ये समावेश आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने मुरबाडचे गौतम चिंतामन पवार यांनी प्रतिनिधीत्व केले असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. हा क्षण महाराष्ट्रातील ‘अन्नदाता’ शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.      

पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ हप्त्यात ६ हजार रूपये मिळणार आहेत. या पैशातून बी-बियाणे, खते, कृषी अवजारे इत्यादी शेतीशी निगडीत बाबींचा  प्रश्न सुटू शकणार आहे. यामुळे देशातील जवळपास १२ करोड छोटे शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.  या योजनेंतर्गत दरवर्षी जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर ७५ हजार करोड थेट जमा  होणार आहेत.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *