Breaking News

आणि पंतप्रधान मोदींचे ममता बॅनर्जी यांच्याबाबतचे भाकित खरे ठरले पश्चिम बंगालमध्ये तृणमुल आघाडीवर मात्र ममता बॅनर्जी पराभूत

मुंबई: प्रतिनिधी

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीची घोषणा सुरु झाल्यानंतर साधारणत: मार्च महिन्याच्या पहिल्या १० दिवसात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारा दरम्यान भाकित केले होते. ते भाकित आज मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या पराभवाने अखेर खरे ठरले.

साधारणत: ८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमध्ये सभा झाली. त्याच्या दोन दिवस आधी निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्कुटी चालवित पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात कोलकता येथे आंदोलन केले होते. त्यावेळी त्या स्कुटी चालविताना एक दोनवेळा पडता पडत्या वाचल्या होत्या. तोच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ८ मार्चच्या सभेत म्हणाले होते की, “अगर स्कुटीने नंदीग्राम जाके गिरना तय किया है तो हम क्या करे” हम तो सबका भला चाहते है अशी वरून टीपण्णीही केली होती.

त्यावेळी नंदीग्राम विधानसभआ मतदारसंघातून एकेकाळचे मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी सुधेंदु अधिकारी यांना उमेदवारी देण्याची चर्चा जोरदार सुरु होती. तरीही ममता बॅनर्जी यांनी आपण नंदीग्राम मधून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.

आज पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाले असून १९५७ या थोड्या मतांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम विधानसभा मतदार संघात पराभव झाला असून तेथे बॅनर्जी यांचे प्रतिस्पर्धी सुधेंदू अधिकारी हे विजयी झाले.

लोकांनी दिलेला कौल आपण स्विकारला असून आपण आपला पराभव स्विकारत असल्याचे त्यांनी संध्याकाळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले.

मात्र काहीवेळानंतर तृणमुल काँग्रेसने या मतदारसंघातील मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी केली. तर निवडणूक आयोगाने सांगितले की नंदीग्रामची मतमोजणी पूर्ण झाली आहे. मात्र शेवटच्या फेरीचा निकाल अद्याप बाहेर आलेला नाही.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *