Breaking News

पंतप्रधान मोदींच कौतुक कोणत्या गोष्टीवरून करू -उद्धव, माझा लहान भाऊ- पंतप्रधान पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या तीन प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबईः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं किती गोष्टींसाठी अभिनंदन करु? काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं, आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण होईल असाही विश्वास शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
तर उध्दव ठाकरे हे माझे लहान भाऊ असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
त्याचबरोबर महाराष्ट्रात पुन्हा युतीचंच सरकार येईल अशी व्यक्त करत आम्हाला सत्तेची हाव नाही मात्र सत्ता हवी असून आपल्या ताकदीचा सदुपयोग करणारा नेता देशाला सापडल्याचे स्तुतीसुमने उध्दव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर उधळली. याबरोबरच आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेत युती होणार असल्याच्या गोष्टीवर उध्दव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले.
मुंबईतील तिन्ही मेट्रोच्या मार्गाचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सांसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
पाच वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी खर्च करणार-मोदी
आपला देश सध्याच्या घडीला ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो आहे. येत्या पाच वर्षात पायाभूत सोयी आणि सुविधा यांच्यासाठी १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
तसेच मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी लवकरच मेट्रोने प्रवास करतील असा विश्वास व्यक्त करत मेट्रोला लागणाऱ्या डब्यांची निर्मितीही देशातच मेक इन इंडिया या कार्यक्रमातंर्गत होणार असल्याने या डब्यांची आयात करावी लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *