Breaking News

… तर लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी
मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनपण लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत आज बोलताना पवारसाहेबांचा उल्लेख केला. त्यावर नवाब मलिक यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला.
सुरुवातीपासून पवारसाहेबांच्या नावांनी स्वतःची केलेली चूक कशी व्यवस्थित आहे हे भाजप जनतेत विषय मांडत आहे. मोदींना आजपर्यंत कळलंच नाही पवारसाहेब या देशातील कृषी सुधार पक्षकार होते, तेव्हापण आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्य सरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारीत केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही पण एकमत निर्माण करणे, लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे हे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान करत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नसल्याचे ते म्हणाले.
नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचा असेल तर सरकारने सर्व विरोधकांना बोलावून विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. सर्वांना मान्य असेल तरच कायदा केला पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मी पुन्हा येईन’ म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील-
‘मी पुन्हा येईन’ म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.
आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही असाही उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. आणि फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उध्दव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *