Breaking News

शिपाईच्या सेवानिवृत्तीला राज्याच्या माजी मुख्य सचिवांसह आजी-माजी सनदी अधिकारी हजर गृहनिर्माण विभागातील आजी-माजी उपसचिव, कक्ष अधिकाऱ्यांचीही उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात एखादा सनदी अधिकारी, मुख्य सचिव अथवा अप्पर मुख्य सचिव सेवानिवृत्त होत असेल तर त्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी सर्वच कर्मचारी आणि अधिकारी एकत्र येतात. मात्र ज्या व्यक्तीने ३४ वर्षे एकाच विभागात शिपाई पदी काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रामाणिक सेवेची पोचपावती म्हणून निवृत्तीच्या दिवशी राज्याच्या माजी मुख्य सचिवांसह आजी-माजी सनदी अधिकारी उपस्थित राहून एक आगवा वेगळा पायंडा पाडल्याचे चित्र मंत्रालयात काल गुरुवारी पहायला मिळाले.

मंत्रालयात असलेल्या गृहनिर्माण विभागातील शिपाई जर्नादन तांडेल हे गेली ३४ वर्षे शिपाई म्हणून काम करत होते. त्यांना वयाची काल ३१ मे रोजी ५८ वर्षे पूर्ण होत असल्याने ते सेवा निवृत्त होत होते. तांडेल यांनी गेली ३४ वर्षे या विभागात येणाऱ्या प्रत्येक प्रधान सचिवांचे शिपाई म्हणून प्रामाणिक सेवा केल्याने त्यांच्या सेवा निवृत्तीमुळे गृहनिर्माण विभागात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या

कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव दिनेश अफजलपूरकर, माजी अप्पर मुख्य सचिव नवीन कुमार, माजी अप्पर मुख्य सचिव रामाराव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, गृहनिर्माण विभागाचे विद्यमान अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, म्हाडाचे माजी उपाध्यक्ष संभाजी झेंडे आणि गृहनिर्माण विभागाचे माजी सह सचिव प्र.ल.पाठक यांच्यासह अनेक आजी-माजी उपसचिव कक्ष अधिकारी उपस्थित होते.

जर्नादन तांडेल यांच्या ३४ वर्षाच्या आपल्या कार्यकाळात जवळपास गृहनिर्माण विभागात प्रधान सचिव म्हणून आलेल्या २२ आयएएस अधिकाऱ्यांचे शिपाई म्हणून काम पाहिलेले आहे. मात्र काही अपवादत्मक परिस्थिती वगळता या २२ प्रधान सचिवांकडून त्यांच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले असेल. परंतु त्यांच्या प्रामाणिक आणि सचोटीपणामुळे या प्रधान सचिवांकडूनही त्यांच्यावर नेहमीच कौतुकाच थाप पडलेली असल्याचे अवर सचिव गोसावी यांनी सांगितले.

याबाबत जर्नादन तांडेल यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, या कालावधीत मी प्रधान सचिवांचा शिपाई वावरत असताना अनेक गोष्टी माझ्या कानावर पडत असायच्या. पण मी कधीही त्या गोष्टी कोणाशी शेअर केल्या नाहीत की कधी कोणाल्या सांगितल्या. साहेबांच्या फाईलीतील कागद ही कधी इकडचा तिकडे केला नाही. माझ्या या प्रामाणिक सेवेमुळेच गुरूवारच्या सेवानिवृतीच्या कार्यक्रमाला माजी प्रधान सचिवांनी उपस्थित रहात माझ्या कामाची पोहोच पावती दिली.

सेवा निवृत्तीच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच सनदी अधिकाऱ्यांनी तांडेल यांच्या प्रामाणिक आणि कामाप्रती झोकून देण्याबद्दलच्या वृत्तीची स्तुती केली.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *