Breaking News

दौरा अतिवृष्टीग्रस्ताचा मात्र राजकारण रंगले फडणवीस-मुख्यमंत्री आणि पवार-राज्यपाल-पाटलांचे निम्म्या महाराष्ट्रावर संकट ओढावलं तरी राजकिय नेत्यांच्या टीका टिपण्या सुरूच

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यत अनेक लहानमोठ्या गावात अतिवृष्टीमुळे घरे वाहून गेलीत तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी शेत पिके जमिनीसकट वाहून गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही काळ शेतकरी आर्थिकदृष्ट्या उभा राहील का असा प्रश्न निर्माण झाला असतानाच या आपद्कालीन परिस्थितीत तरी राज्यातील नेत्यांनी यातही राजकिय वार-पलटवार करण्याची आणि टोला लगावण्याची संधी गमावली नसल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

अतिवृष्टीने ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील प्रविण दरेकर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दौऱ्यावर आहेत.

यापैरी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्ताच्या आधारे सगळी जबाबदारी केंद्रावरून ढकलून आपण नामानिराळे रहायचे अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्टरवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली.

तर सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या टीकेची दखल घेत राज्यात झालेल्या अतिवृष्टीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांनी याप्रश्नी स्वत:हून फोन करून माहिती घेतली. तसेच मदतीसाठी केंद्र सरकार तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात गैर सल्याचे सांगत कमी पणा आहे असा सवाल करून पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे अशी सूचना करत शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. राजकारणाचा चिखल उडवू नये असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.

तर दुसऱ्याबाजूला आज उस्मानादच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोडून गेलेल्यांनी आहे त्याच ठिकाणी सुखात रहावे असा उपरोधिक टोला एकेकाळचे पवार यांचेच निकटवर्तीय पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र जगजीतसिंग राणा यांना लगावला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कमबॅक अभियानात पाटील पुता-पुत्रांना स्थान नसल्याचे संकेत दिले.

तसेच पवारांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा धागा पकडत राज्यपालांवर निशाना साधत शाह यांच्या वक्तव्यांनंतर राज्यपाल अद्याप त्याच पदावर कसे असा सवाल करत पदाची शान राखण्याची आता कोश्यारीं यांच्यावर असल्याचे सांगत राज्यपालांनाही चिमटा काढला.

Check Also

मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाला रोखण्याचा भाग म्हणून जरी लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत असली तरी लस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *