Breaking News

विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात

मुंबईः प्रतिनिधी
संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील जनतेची नाडी ओळखण्यासाठी चक्क सरकारी यंत्रणा वापरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.
लोकसभा निवडणूकांना अद्याप चार ते सहा महिन्याचा अवधी असला तरी सर्वच राजकिय पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरु केली आहे. त्यासाठी उमेदवारांच्या चाचपणीपासून ते प्रचाराच्या रणधुमाळी पर्यंत तयारी सुरु केलेली आहे. परंतु भाजपकडून एकाबाजूला पक्षिय पातळीवर तयारी सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला मात्र निवडणूकीसाठी सरकारी यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतलेला दिसून येत आहे. त्यासाठी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंतचा कर्मचारी कंत्राटी पध्दतीने नियुक्त करून या यंत्रणेमार्फत राज्यातील जनतेची नस ओळखण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती सामान्य प्रशासनातील विश्वसनीन एका उच्च अधिकाऱ्यांनी दिली.
या यंत्रणेअंतर्गत पदे भरण्यासाठी काही प्रसारमाध्यमांमध्ये जाहीरातीही प्रसिध्द करण्यात आली असून पाच दिवसात अर्ज करण्याचे आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व नियुक्त्या ६ महिन्याच्या कंत्राटी पध्दतीवर करण्यात येणार असून त्यानंतर गरज वाटल्यास या कर्मचाऱ्यांचे कंत्राट कालावधी वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूकीसाठी पहिल्यांदाच सरकारकडून शासकिय यंत्रणा आणि पैसा वापरण्याचे पहिल्यांदाच घडत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *