Breaking News

बचाने की ताकद किसमे है? परमबीर सिंग आणि त्रिवेदी यांचे फोन संभाषण व्हायरल आयपीएस अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीतून वाचविण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची निवृत्त एसीपीला धमकीवजा विनंती

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यात १०० कोटीं रूपयांच्या खंडणी वसुलीवरून राजकिय वर्तुळात खळबळ माजली असतानाच आपल्या गटातील तीन अधिकाऱ्यांना पोलिस दलाच्या विभागीय चौकशीतून वाचविण्यासाठी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी निवृत्त एसीपी त्रिवेदींना अधिकाऱ्याला फोन करून तक्रार मागे घेण्याबाबत विनंती वजा धमकी फोनवरून दिल्याची संभाषण क्लिप नुकतीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली.

फोनवमधील संभाषणात संबधित निवृत्त एसीपी अधिकाऱ्याला समोरील आयपीएस अधिकारी विचारणा करत तु राज्य सरकारकडे केलेली तक्रार मागे घेणार आहेस कि नाही? तु तक्रार मागे घेतल्यास श्रीमती अंबिका या तुझ्या बाजूने जबाब देतील.

त्यावर फोनवरील निवृत्त अधिकारी म्हणतो की, माझ्या विरोधात अंबिका मॅडमने बरेच घाणेरडे लिहिलेय त्यामुळे मी ही अडचणीत येवू शकतो. सरकारने देवेन भारती, अंबिका यांच्या विरोधात चौकशी सुरु केलीय. त्यामुळे मी जर त्यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतला तर माझी चौकशी निश्चित आहे. त्यामुळे मी त्यांना भेटलो. ते माझ्यावर जाम चिडले आहेत.

त्यावर आयपीएस अधिकारी म्हणतो तुला वाचविण्याची ताकद त्याच्याकडे जास्त आहे की माझ्याकडे (एचएम) . त्यामुळे त्याच्याकडे जाण्याची गरज नाही. तो कोण आहे? तुझा सुपिरीयर अधिकारी आहे ना. एक अर्ज दे आणि माघार घे.

त्यावर निवृत्ती एसीपी अधिकारी म्हणतो की, मी अंबिका मॅडमना विरोधात तक्रार राहीली तरच मी वाचू शकतो.

या संभाषणावरून पोलिस दलात असलेले गटा-तटातील राजकारण पुन्हा एकदा पुढे आले असून एकमेकांना वाचविण्यासाठी आयपीएस अधिकारी निवृत्त अधिकाऱ्यावरही दबाव आणायला मागे पुढे पहात नाहीत. तसेच या संभाषणात पोलिस दलातील आयपीएस अधिकारी देवेंन भारती, श्रीमती अंबिका, माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची नावे आहेत. त्यामुळे या संभाषणाकडे गांभीर्याने घ्यावे लागणार आहे.

सोबत- फोन संभाषणानुसारची टिपणे आणि तक्रार दोन्ही खालीलप्रमाणे..

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *