मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता आदी पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे.
