Breaking News

महेश कोठारेंच्या पाणी चित्रपटाचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते शुमारंभ पाणी टंचाई आणि ग्रामीण जीवनाचे विदारक वास्तवाचे दिग्दर्शन आदीनाथ कोठारे करणार

नांदेड : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई व ग्रामीण जीवनाची विदारकता दाखविणारा सुप्रसिद्ध सिनेनिर्माता महेश कोठारे निर्मित व आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणीया मराठी चित्रपटाचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

हा चित्रपट ग्रामीण जीवनातील विदारक आर्थिक परिस्थिती व पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती या विषयासंदर्भात असून हा चित्रपट कंधार तालुक्यातील एका तांडा वस्ती परिसरात चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटाचा शुभारंभ कंधार तालुक्यातील रामनाईक तांडा या ठिकाणी करण्यात आला. यावेळी आ.सौ.अमिताताई चव्हाणआ.अमरनाथ राजूरकर,चित्रपटाचे निर्माते महेश कोठारेदिग्दर्शक आदिनाथ कोठारेसिनेदिग्दर्शक वामन केंद्रेमाजी आ.रोहिदास चव्हाणचित्रपटातील कलावंत सुबोध भावे,सिद्धार्थ चोप्राकंधारचे माजी नगराध्यक्ष रामराव पवारमाजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरीकाँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकरप्रशांत चालिकवारसंजय पवार आदिंची उपस्थिती होती.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *