Breaking News

बँकेच्या पैशातून कामाचा शिणवटा घालवायला एससी आयोग गेला क्रुजने गोव्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पैशातून गोवा दौऱ्याचा खर्च

मुंबई : विशेष प्रतिनिधी

विविध शासकिय यंत्रणांच्या कार्यालयामध्ये अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होतात का?, त्यांना पदोन्नतीत डावलले तर जात नाही ना, समाजात या जातीतील महिलांवर कोणता अन्याय तर होत नाही ना यासह या जातीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्यापासून अनुसूचित कायद्याची अंमलबजाणी होत की नाही यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय अनुसूचित जातीचे सदस्य मुंबई दौऱ्यावर आले असून ते दिवसभरात दोन तासांचे काम केल्यानंतर कामाचा शिणवटा घालविण्यासाठी एसबीआय बँकेच्या पैशातून गोव्याला रवाना असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय बँकेत एससी कायद्याची अंमलबजावणी होते की नाही यासह अनेक प्रश्नांवरील माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष विजय संपला, उपाध्यक्ष अरूण हलदेर, सदस्य सुभाष पारधी, श्रीमती अंजू बाला, सदस्य संचालक अजित कुमार साहू, संचालक कौशलकुमार, अवर सचिव किशन चंद, खाजगी सचिव प्रविण, अध्यधांचे खाजगी सहाय्यक भुपेंदर भोला, नविन रोहीला आणि सदस्यांचे खाजगी सचिव हे मुंबई दौऱ्यावर ३० सप्टेंबर २०२१ रोजी आलेले आहेत.

त्यानंतर १ ऑक्टोंबर २०२१ रोजी आज शुक्रवारी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांबरोबर सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत अनूसूचित जातीतील कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने बैठक घेतली. त्यानंतर ते दुपारी २.३० वाजता अंगडीया क्रुजने मुंबईहून समुद्र मार्गे गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती एसबीआय बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विशेष म्हणजे या अनुसूचित जाती आयोगाच्या या सदस्यांची गोव्यामध्ये कोणतीही अधिकृत बैठक नाही की कामकाज नाही. तरीही हे सदस्य क्रुजने गोव्याकडे गेले आहेत. गोव्यामध्ये आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य २ ऑक्टोंबर २०२१ रोजी दिवसभर थांबून रात्रीचा मुक्काम करून ३ तारखेला पुन्हा मुंबईहून दिल्लीस रवाना होणार आहेत. दरम्यान या गोवा दौऱ्याचा खर्च पूर्णपणे स्टेट बँके ऑफ इंडियाच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे.

लोकांनी ठेवलेल्या ठेवी स्वरूपातील पैशातून आणि कर्जाऊ स्वरूपात घेतलेल्या पैशावरील व्याजाच्या पैशातून अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्ष, सदस्य आणि त्यांचे खाजगी सचिव कामाचा शिणवटा घालविण्यासाठी गोव्याला जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबईत आल्यानंतर सकाळी कोणत्याही विभागाने बैठका ठेवू नये अशी ताकीदही आयोगाच्या अध्यक्षांनी मुंबईतील विभागांना दिली आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या कृत्याबद्दल स्टेट बँकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय एससी आयोगाच्या सदस्यांची हीच ती दौऱ्याची माहिती:-

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *