Breaking News

एनसीबी-वानखेडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता: कारवाईला सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार आहेत पत्र-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

एनसीबीच्या छापासत्रातून संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देत अंमली पदार्थप्रकरणी कारवाई झाली पाहिजे असेही ते म्हणाले.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्यावरून मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर संध्याकाळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेवून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

एनसीबीचे छापासत्र व त्यातून होणारी मांडवली यासंदर्भात मुंबई पोलीस लवकरच गुन्हा नोंद करतील. त्यानंतरच या प्रकरणाची चौकशी होणार होऊ शकते. एकदा गुन्हा नोंद झाला की सर्व तथ्ये समोर येतील, असेही ते म्हणाले.

हॉलीवूडनंतर मुंबईतील बॉलीवूड हा जगातील मोठा चित्रपट उद्योग आहे. केवळ चित्रपट कलाकार नव्हे तर लाखो लोकांचा रोजगारही या उद्योगावर अवलंबून आहे. देशाच्या दरडोई उत्पन्नात चित्रपट उद्योगाचा मोठा वाटा आहे. तसेच मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या संस्कृतीचा जगात प्रसार होतो. अंमली पदार्थ प्रकरणी कारवाई करण्याबाबत आमचे दुमत नाही. मात्र संपूर्ण चित्रपट उद्योग अंमली पदार्थाच्या आहारी गेलेली आहे, हे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जाते, ते चुकीचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीबीच्या छापासत्रामुळे बॉलीवूडची बदनामी होत असून त्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत तीव्र चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉलीवूडच्या तब्बल २६ कलाकारांवर आजपर्यंत एनसीबीने एकतर छापा टाकला किंवा अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी चौकशी केली. यातून मिडीया ट्रायल होते आणि कलाकारांना बदनाम केले जाते. ज्यांची एनसीबी चौकशी करते, त्यांना अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी शिक्षा मात्र होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मी दोन दिवस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. तेव्हा मी सांगितले होते की गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे मी एनसीबीच्या कारवाईसदंर्भात तक्रार करणार आहे. तशी मी आज केली. काही पुरावे ती त्यांना दिले. आता पोलीस त्यांचे काम करत आहेत. याप्रकरणाची सर्व माहिती लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *