Breaking News

केंद्र सरकारकडून अल्पबचत ठेवींवरील व्याजात कपात कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कपात तीन महिन्यासाठी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

मध्यम वर्गीय आणि सर्वसामान्य नागरीकांकडून पैशांची बचत करण्याकरीता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध योजनांमध्ये पैश्याची गुंतवणूक केली जाते. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन महिन्याकरीताअल्पकालीन बचतीवरील व्याजात १ ते ३ टक्क्यापर्यंत कपात करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

या अल्पकालीन बचतीमध्ये साधारण बचतीवर ४ टक्के व्याजात कोणताही बदल केला नाही. मात्र याव्यतीरिक्त एक ते तीन वर्षे ठेवीवरील व्याजात तीन महिन्यासाठी १.४ टक्क्याने कपात केली. तर पाच वर्षापर्यंतच्या ठेवीवरील व्याजात अनुक्रमे १ आणि २ टक्क्याने कपात, ज्येष्ठ नागरीकांकडून करण्यात येणाऱ्या बचत ठेवीवरील व्याजात १.२ टक्क्याने कपात, मासिक उत्पन्न खात्यावर मिळणाऱ्या व्याजात १ टक्का, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजात १.१ टक्क्याने कपात, प्रॉव्हीडंट फंड प्रमाणपत्रावर मिळणाऱ्या व्याजात .८ टक्क्याने कपात, किसान विकास पत्रावरील व्याजात .७ टक्क्याने कपात केली. तर सुकन्या समृध्दी खात्यातील ठेवींवरील व्याजात १ टक्क्याने कपात करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *