Breaking News

देणे समाजाचे एक सद्भावना महोत्सव देणे समाजाचे अंतर्गत सामाजिक संस्थांच्या महोत्सवाचे विलेपार्ले येथे आयोजन

मुंबईः प्रतिनिधी
देणे समाजाचे या व्यासपीठाअंतर्गत राज्यातील ३० विविध सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख समाजाला करुन देणे, त्यांना आर्थिक कुवतीनुसार अन्य स्वरुपात मदत मिळवून देणे हे उद्दिष्ट समोर ठेवून पुण्यातील आट्रिस्ट्री संस्थेच्या वीणा गोखले यांनी मुंबईतील विले पार्ले येथे ८ आणि ९ फेब्रुवारी असे दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
सामाजिक संस्थांना प्रत्यक्ष भेट दिल्यावर त्यांच्यासाठी कॄतज्ञता म्हणून काहीतरी करावे या विचारातून वीणा गोखले यांनी आपल्या ‘आर्टिंस्ट्रीङ्द्वारे देणे समाजाचे हा उपक्रम सुरु केला. या भेटीत त्यांना जाणवलं की संस्थांना त्याचे कार्य पुढे चालविण्यासाठी अनेक प्रकारच्या मदतीची गरज असून त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या विचारातून या उपक्रमाची सुरवात झाली. गेले १५ वर्ष पुणे येथे सामाजिक संस्थांचे प्रदर्शन आयोजन करत असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत १८० सामाजिक संस्थांना समाजासमोर आणले आहे. शिवाय या संस्थांना साडे पाच कोटींहून अधिक रुपयांचा मदत निधीही मिळवून दिला आहे. सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी न करता हा उपक्रम व्रतस्थपणे राबविण्यात येत आहे.
देणगीदार आणि सामाजिक संस्थांमध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेल्या देणे समाजाचे हा उपक्रम गत वर्षीपासून मुंबईतही आयोजित करण्यात येत आहे. सामाजिक संस्था ज्या अनेकविध विषयावर तळमळीने काम करतात त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांनाही सतपात्री दान करण्याची संधी यामुळे मिळते. सहभागी संस्था या संपूर्णं महाराष्ट्रातील आहेत. समाजातील काही घटकांना लोक वज्र्य करतात. परंतु त्यांच्यासाठीही काम करण्याची गरज आहे हे जाणून या संस्था काम करत आहेत. ह्या वर्षी ८ आणि ९ फेब्रुवारी २०२० रोजी विलेपार्ले येथील सावरकर सेवा केंद्र येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजसेवी संस्था कोणकोणत्या क्षेत्रात काम करतात याची आपल्याला कल्पनाही नसते, त्यामुळे भेटणं तर दूरच. पण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून अशा ३० संस्थांना तुम्ही भेटू शकता. यंदा या उपक्रमात अनाथ मुलांचा सांभाळ करणारी बीडची सहारा संस्था, एच.आय.व्ही पाँझिटीव्ह स्त्रीया, मुले यांचा सांभाळ करणारी इनफंट इंडिया, मतिमंद मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणारी आधार आणि घरकुल या अनुक्रमे बदलापूर आणि नाशिक येथील संस्था, संवेदना फाउंडेशन जी फीट येणाऱ्या पेशंटना मदत करते, याशिवाय अहमदनगरची स्नेहालय, लातुरची सेवालय, काश्मिरमधील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणारी असीम फाउंडेशन या आणि अशा एकूण ३० संस्था देणे समाजाचे उपक्रमात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या गरजू संस्थांना मदत करावी असे आवाहन आट्रिस्ट्रीच्या वीणा गोखले यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९८२२०६४१२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *