Breaking News

कोरोना : अबब ६७ हजार बाधित…जाणून कोणत्या जिल्ह्यात किती रूग्ण ५३ हजार ७८३ बरे झाले, तर ४१९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात काल आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा आज ४ हजार अधिक रूग्णांचे निदान झाले असून आतापर्यंतची सर्वाधिक ६७ हजार १२३ इतकी रूग्ण संख्येवर पोहोचली आहे. मात्र बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या तुलनेत ५३ हजार ७८३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने राज्यातील बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ३० लाख ६१ हजार १७४ वर पोहोचली आहे. तर रिकव्हरी दर ८१.१८ टक्के इतका आहे. तसेच आज आढळून आलेल्या बाधितांच्या संख्येमुळे राज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ४७ हजार ९३३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तर राज्यात आज ४१९  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख महानगर असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांच्या संख्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. परंतु दैनदिन रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात घट होताना दिसून येत नाही. तर दुसऱ्याबाजूला या महानगरांमधील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणात पुरेशी वाढ होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या बाधित रूग्णांमधील अनेक रूग्ण हे कमी सिम्टन्स कमी असल्याचे तर काहीजण असिम्टीमन्स असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या मंडळातील इतर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८,८११ ५,७१,०१८ ५१ १२,३०१
ठाणे १,०७४ ६८,०७० १,०३८
ठाणे मनपा १,५९३ १,०७,११८ १,४२३
नवी मुंबई मनपा १,१७५ ९१,९०९ १,२५३
कल्याण डोंबवली मनपा १,४५३ १,१०,६७९ १६ १,१८८
उल्हासनगर मनपा १६१ १७,२५५ ३८८
भिवंडी निजामपूर मनपा ७२ ९,३८३ ३७१
मीरा भाईंदर मनपा ६०५ ४०,५९९ ७२६
पालघर ६९८ २५,४०२ ३२९
१० वसईविरार मनपा ७११ ४४,१८८ ८०३
११ रायगड ८२२ ५१,७४२ १,०४४
१२ पनवेल मनपा ८०० ४९,०२३ ७१०
ठाणे मंडळ एकूण १७,९७५ ११,८६,३८६ ८५ २१,५७४
१३ नाशिक १,६४६ ८१,१५२ १७ १,०५२
१४ नाशिक मनपा २,१८२ १,५६,२८० १० १,३३०
१५ मालेगाव मनपा २० ७,५२४ १९२
१६ अहमदनगर २,१८९ ८७,५९० ३५ ९३९
१७ अहमदनगर मनपा ९१३ ४२,७४६ १६ ५२८
१८ धुळे १८३ १८,६८२ २२३
१९ धुळे मनपा ७० १५,००८ १८२
२० जळगाव १,१२७ ७८,४९८ १९ १,३१३
२१ जळगाव मनपा १३४ २६,४०८ १० ४०५
२२ नंदूरबार ३६५ २७,७८५ ३८१
नाशिक मंडळ एकूण ८,८२९ ५,४१,६७३ १०८ ६,५४५
२३ पुणे ३,७९२ १,६६,१३९ २,३३०
२४ पुणे मनपा ६,०८४ ३,७०,८०६ २५ ५,००४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,९४९ १,७६,१९९ १,४३८
२६ सोलापूर १,१६३ ६१,३०३ १,३४७
२७ सोलापूर मनपा २९७ २२,९६० ७१६
२८ सातारा १,४८९ ८०,२५२ २,००१
पुणे मंडळ एकूण १५,७७४ ८,७७,६५९ ४९ १२,८३६
२९ कोल्हापूर ३४९ ३८,३३२ १,२८१
३० कोल्हापूर मनपा १३३ १७,४१५ ४४०
३१ सांगली ६३६ ४१,७०२ १,२१९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३४ २१,६४२ ६९०
३३ सिंधुदुर्ग ३२३ ९,७२२ २१८
३४ रत्नागिरी ३५८ १५,८३५ ४४४
कोल्हापूर मंडळ एकूण २,०३३ १,४४,६४८ १४ ४,२९२
३५ औरंगाबाद ५८२ ३१,६२३ ४००
३६ औरंगाबाद मनपा ८१४ ७५,४१९ १,११२
३७ जालना ९०२ ३४,०६० ५४२
३८ हिंगोली १८८ १०,४५९ १२७
३९ परभणी ५५४ १३,०१३ २३३
४० परभणी मनपा ३१५ १२,०२७ २१५
औरंगाबाद मंडळ एकूण ३,३५५ १,७६,६०१ १३ २,६२९
४१ लातूर १,२६२ ३९,२४७ १० ५६३
४२ लातूर मनपा ३३२ १४,७६४ २९२
४३ उस्मानाबाद ६२४ २९,६०२ १२ ६९१
४४ बीड १,२२७ ३८,९५२ ७३१
४५ नांदेड १,०२५ ३१,०६७ २३ ६१४
४६ नांदेड मनपा ४८२ ३६,८३७ ११ ५७२
लातूर मंडळ एकूण ४,९५२ १,९०,४६९ ६४ ३,४६३
४७ अकोला ८७ १२,३६६ १७७
४८ अकोला मनपा १५१ २१,७८३ ३६०
४९ अमरावती ४९१ २०,९६१ ३५६
५० अमरावती मनपा २६० ३४,५७४ ३७८
५१ यवतमाळ ७४६ ३४,०३९ १३ ६१७
५२ बुलढाणा ७३ ३७,२२७ ३४१
५३ वाशिम ६७३ २१,९४२ २१७
अकोला मंडळ एकूण २,४८१ १,८२,८९२ ४० २,४४६
५४ नागपूर २,३५८ ६७,७५८ ११ १,०५७
५५ नागपूर मनपा ५,१२६ २,५६,९५६ २३ ३,४१५
५६ वर्धा ८०३ ३०,२२८ ४१५
५७ भंडारा १,२१८ ३६,५६६ ३३४
५८ गोंदिया ८६४ २४,६४० २२५
५९ चंद्रपूर ७८१ २६,४२८ ३१४
६० चंद्रपूर मनपा २७० १४,४१३ १९३
६१ गडचिरोली ३०४ १३,२४४ १२१
नागपूर एकूण ११,७२४ ४,७०,२३३ ४३ ६,०७४
इतर राज्ये /देश १४६ १११
एकूण ६७,१२३ ३७,७०,७०७ ४१९ ५९,९७०

आज नोंद झालेल्या एकूण ४१९ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९७ मृत्यू, अहमदनगर- ३९, पुणे- १२, यवतमाळ- १२, बुलढाणा- ९, ठाणे- ८, नागपूर- ६, जळगाव- ४, नांदेड- ३, भंडारा- १, पालघर- १, रायगड- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *