Breaking News

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे का गरजेचे? जाणून घ्या फायदे या ८ गोष्टींसाठी आयटी रिटर्नचे फायदे होवू शकतात

मुंबई: प्रतिनिधी

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर भरण्याचे फायदेही अनेक आहेत. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस पुरावा सादर केलेला असतो. आयकर रिटर्न भरण्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

1) कर्ज सहज मिळते

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आयकर रिटर्न हा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. कर्जासाठी बँक तुमच्याकडे २ ते ३ वर्षांचे आयकर रिटर्न मागते.  आयटीआर भरला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल.

2) व्यवसायासाठी लाभदायक

व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयटीआर महत्वाचे आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणत्या विभागाकडून कंत्राट मिळवायचं असेल तर तेव्हाही आयटीआर दाखवावे लागते. कंत्राट मिळवण्यासाठी मागील ५ वर्षांचे आयकर रिटर्न द्यावे लागते.

3) मोठ्या व्यवहारांमध्ये फायदेशीर

वेळेवर आयटीआर भरल्यामुळे प्रॉपर्टी खरेदी – विक्री, बँकेत मोठी रक्कम जमा करणे, म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येण्याची भिती राहणार नाही. नियमीत आयकर रिटर्न भरणारे लोक या भितीपासून दूर राहतील.

4) क्रेडिट कार्डसाठी

आयटीआरमुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेल. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.

5) विमा संरक्षण

तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा (टर्म प्लान) घ्यायचा असेल तर विमा कंपनी तुमच्याकडे आयटीआर मागू शकते. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत माहिती करून घेण्यासाठी आणि नियमीत उत्पन्नाची खात्री होण्यासाठी विमा कंपनी आयटीआरवरच विश्वास ठेवतात.

6) टीडीएस क्लेम

तुमच्या उत्पन्नावर टीडीएस कापला असेल तर तो परत मिळवण्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही फ्री लान्सिंग किंवा घरून काम करत असाल आणि तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरीही तुम्हाला वेतन देणारा टीडीएस कापू शकतो. अशावेळी आयकर रिटर्न भरून तुम्ही टीडीएस रिफंड घेऊ शकता.

7) वास्तव्याचा पुरावा

आयकर रिटर्नची कॉपी हा तुमच्या वास्तव्याचा ठोस पुरावा आहे. याचा वापर तुम्ही सरकारी कामातही करू शकता. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तुम्ही वास्तव्याचा पुरावा म्हणून आयटीआर कॉपी देऊ शकता.

8) व्हिजा मिळणं सोपं

जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआर महत्त्वाचे आहे. बहुतांशी परदेशी दुतावास व्हिजा अर्जात मागील २ वर्षांचे आयकर रिटर्न मागतात. जर तुमच्याकडे आयटीआर असेल तर इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला व्हिजा मिळणे सोपे होते.

Check Also

व्होडाफोन आयडियाचा एफपीओ १८ एप्रिलला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी, सरकार फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) द्वारे व्होडाफोन आयडियाच्या निधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *