Breaking News

पाटलांची जीभ घसरली आता पाय घसरला जाऊ नयेः आर्यनचे ते व्हिडिओ जाहिर करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका आणि मागणी

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर आज अखेर चंद्रकांत पाटील यांनी आपली जीभ घसरल्याचे मान्य करत त्याबाबत जाहिरपणे दिलीगिरी व्यक्त केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक म्हणाले की, ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी असा उपरोधिक टोला यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
एनसीबीच्या अधिकार्‍याने आर्यन खान याचे कधी काऊ़सिलिंग केले त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे – नवाब मलिक
मागील काही दिवसांपासून आर्यन खान याचे काऊंसलिंग करण्यात येत आहे. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अशी ग्वाही दिली सारखे अनेक वृत्त प्रसारमाध्यमांतून पुढे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीला थेट आव्हान देत इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्‍या एनसीबीच्या अधिकार्‍याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे अशी मागणी एनसीबीकडे दिले.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सापडलेल्या शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबीने काऊंसिलिंग केले अशा बातम्या चालवल्या जात असल्याचे नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याचा आपल्या शब्दात समाचार घेतला.
एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग जेलमध्ये करायला गेले होते का? अशी विचारणा करतानाच देशातील मोठे वकील हरीश सालवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत असाही थेट आरोप त्यांनी केला.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *