Breaking News

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना हे आव्हान निवडणूकीतील डिपॉझिट जप्त करण्याची ताकद

मुंबई : प्रतिनिधी

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापूर मध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले.

भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला नवाब मलिक यांनी तसेच जोरदार उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील हे तुळजापूरमध्ये निवडणूक घ्या असे सांगतानाच निवडून आलो नाही तर राजकीय संन्यास घेत हिमालयात जाईन अशी घोषणा केली होती.

दरम्यान तुळजापूर विधानसभा ही भाजपकडे आहे. त्या आमदारांचा राजीनामा घ्या आणि भाजपची हिंमत असेल तर राजीनामा घेवून चंद्रकांत पाटील यांनी उभं राहून दाखवावं त्यांना पराभूत कसं करायचं हे दाखवून देवू असे जाहीर आव्हानच नवाब मलिक यांनी दिले.

 

Check Also

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *