Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन २०२२ मुंबई १ मार्चपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिशन मुंबई २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या मिशनच्या निमित्ताने १ मार्च रोजी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर सोमय्या मैदान चुनाभट्टी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. शिबिरात पक्षाचे पैसे भरुन रजिस्टर केलेले ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सुरुवात या शिबिरातून करणार असून मिशन २०२२ मुंबई महानगरपालिका असे असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी १०.१० वाजता या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदींसह दिवसभर मंत्रीगण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्डनिहाय संघटना बांधली जाणार आहे. पक्षाचे सेल आहेत त्यांच्या वॉर्ड निहाय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सत्तेत आल्यावर आता सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवणार असून मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डमध्ये उमेदवारांची तयारी केली जाणार आहे. आघाडी होणार आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाची तयारी ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत मागील निवडणुकीत १४ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु आता मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *