Breaking News

हसन मुश्रीफ यांना डॉक्टरांचा आठवडाभर विश्रांतीचा सल्ला डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे निदान

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आजारी पडले असल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आठभर विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी अहमदनगरचा दौरा रद्द केल्याची माहिती दस्तुरखुद्द मुश्रीफ यांनीच ट्विटरवरून दिली.

मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठकपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरु असताना ताप वाढतच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मी तात्काळ बॉम्बे हॉस्पिटल येथे जावून तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे डॉक्टरांनी निदान करत त्याची साथ सध्या सुरु असल्याचे सांगितले. ताप उतरल्यानंतर प्लेटलेटंस कमी होतात, अशक्तपणा येतो, उपचारानंतर मला घरी डिस्चार्ज देण्यात आला. परंतु मला एक आठवडा विश्रांतीची सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

यामुळे मला पूर्वनियोजित अहमदनगरचा दौराही रद्द करावा लागला असल्याचे सांगत माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्ये चाहते यांनी काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले.

मागील आठवड्याच्या सोमवारी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियावर १२०० कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. मात्र सोमय्या यांची पत्रकार परिषद संपताच मुश्रीफ यांनीही लगोलग पत्रकार परिषद घेत सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांना कोल्हापूरा येवून माहिती घेण्याचे आवाहन करत त्यांच्या विरोधात १०० कोटी रूपयांचा दावा ठोकण्याचा पलटवार केला होता. तसेच ही सगळी कारवाई आठव़डाभरात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. मात्र तत्पूर्वीच हसन मुश्रीफ यांना डेंग्युची लागण झाल्याचे दिसून आल्याने आणखी काही काळ तरी यो दोघांमधील राजकिय युध्द पाह्यला आणखी कालावधी थांबवे लागणार आहे.

दरम्यान, सोमवारी एक दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या किरीट सोमय्या यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यामुळे सोमय्या यांचा  कोल्हापूर दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे भाजपाने आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकारवर टीका करत लोकशाहीवर घाला असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेबरोबरच भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असून हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्या सूचनक वक्तव्यावरू खुष झालेली भाजपा आता राजकिय युध्दासाठी तत्पर झाल्याचे दिसून येत आहे.

Check Also

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तज्ञांची समिती: जानेवारीपासून नवे शैक्षणिक वर्ष ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *