Breaking News

हे करा… ते करा बोलणं योग्य नाही, गुजरात मॉडेलचे बघा भाजप नेत्यांवर नवाब मलिक यांचे टिकास्र

मुंबई: प्रतिनिधी
देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावत गुजरातमधील गुजरात मॉडेलचे काय होत आहे त्याकडेही लक्ष द्या असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
भाजपचे नेते लॉकडाऊनमधील वेगवेगळ्या पॅकेजबाबत बोलत असून त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.
महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही. दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागच्या लॉकडाऊनमध्ये राज्याने गरीब मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली आताही गरज वाटेल तेव्हा व्यवस्था करेल
पॅकेज जाहीर करून कर्जबाजारी व्हा… कर्ज घ्या असे मोदीजी जाहीर करतात पण या राज्यात लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना केंद्राप्रमाणे पैसे देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात जो गरीब मजुर वर्ग आहे त्यांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी सरकारने चार महिने सगळी व्यवस्था केली होती. आताही गरज वाटेल तेव्हा सरकार निश्चितरुपाने व्यवस्था करेल असेही ते म्हणाले.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी परिस्थिती आम्हाला शिकवत आहेत त्यांनी गुजरातमध्ये हॉस्पिटलशिवाय लोकं मरत आहेत. गुजरात मॉडेलची काय परिस्थिती आहे हे बघितले पाहिजे असा सल्लाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
लॉकडाऊनमध्ये राज्यात ज्यापध्दतीने कामे सुरू आहेत त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कौतुक करत आहेत. शिवाय केंद्रीयमंत्री महेंद्र पांडे मुंबईत आले असता त्यांनीही कौतुक केले. अशाप्रकारची कामे कुठल्याही राज्यात झाली नाहीत याची आठवण करून देत उत्तरप्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर करत नाही. अन्टीजेन चाचण्या ८० टक्के अक्युरसी नाहीत. युपी सरकारने योग्यप्रकारे टेस्टींग केल्या तर वेगळी परिस्थिती होवू शकते असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्य सरकार जिंदाबाद… मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा दिल्याय. परंतु तिथे गेल्यावर भाजपचा मुर्दाबाद केला हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकांची काळजी घेणार… कुणालाही वार्‍यावर सोडणार नाही. आम्ही आमच्या लोकांची काळजी घेणार… कुणालाही वार्‍यावर सोडणार नाही ही आमची प्राथमिकता आहे असे सांगतानाच भाजपशासित राज्यामध्ये काय चालले आहे याकडे केंद्राने लक्ष द्यावे असा सल्ला भाजपच्या नेत्यांना मलिक यांनी दिला.
केंद्र सरकार ज्या काही सूचना देत आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. ज्या जिल्हयात टेस्टींगच्या क्षमता कमी आहेत तिथे मशीन खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र काही राज्यात अन्टीजेनच्या आधारावर आकडे दाखवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपल्या राज्यात ८० टक्के आरटीपीसीआर चाचण्या होतात. प्रत्येक जिल्हयात आरटीपीसीआर करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. आम्ही केंद्राच्या सूचनांचे तंतोतंत पालन करतोय आणि त्याची अंमलबजावणीही करु, परंतु केंद्र सरकारने पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश यांनाही सूचना द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड  कोसळण्याच्या घटना घडल्या. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *