Breaking News

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुपुत्राचा अनोखा राजकिय प्रवेश स्वत:बरोबर आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राजकिय नेत्यांच्या सुपुत्रांचे राजकारणात प्रवेश हे ऐन निवडणूकीच्या काळात तरी होतात किंवा पक्ष संघटनेच्या पदावर नियुक्ती होवून तरी होतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांचा राजकारणात अनोख्या पध्दतीने प्रवेश केला असून मोफत लस घेतल्यानंतर स्वत:सह आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून राज्याला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रतिक पाटील यांनी स्वत: एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

वाढत्या कोरोना संख्येमुळे राज्यात कडक निर्बंधाच्या आड जरी अप्रत्यक्ष लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे जनतेच्या रोजगारावरबरोबरच राज्याच्या तिजोरीवरही ताण पडून सध्या आर्थिक चणचणींचा सामना राज्य सरकारला करावा लागत आहे. तरीही ६ हजार ५०० कोटी रूपये खर्च करत कोरोनापासून बचाव करण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लसीच्या पैशांबरोबर आणखी पाच जणांच्या लसींचे पैसे ते स्वत: भरणार आहेत.

जयंत पाटील यांना मानणाऱ्या समर्थकांकडून अशा पध्दतीने १० हजार नागरीकांच्या लसींचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहेत. याशिवाय जे सधन व्यक्ती आहेत त्यांनीही या Citizens4Maharashtra अभियानातंर्गत लसींचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांच्या एका समर्थकाने दिली.

या अभियानात लवकरच चित्रपट अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह काही मराठी चित्रपटातील सेलिब्रिटीही सहभागी होणार असून लसीकरणासाठी राज्य सरकारवर येणारा आर्थिक भार काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर दुसऱ्याबाजूला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सत्यजीत तांबे यांनीही ज्यांना लसींचे पैसे भरणे शक्य आहे. त्यांनी सदरची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी असे आवाहन केले.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या सुपुत्राने राज्याच्या राजकारणात जरी प्रत्यक्ष प्रवेश केलेला नसला तरी त्यांचा अप्रत्यक्ष प्रवेश झाल्याचे या निमित्ताने सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्याकडून असे विविध समाजपयोगी अभियान राबवित आपले स्वत:चे राजकिय स्थान निर्माण करण्यात कितपत यशस्वी होतात हे लवकरचं कळेल.

प्रतिक जयंत पाटील यांचे नागरीकांना आवाहन

लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार. स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार असून राज्यातील तरुणांनाही अशा पध्दतीने लशीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी असे आवाहन केले.

आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे. देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेत आहे.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *