Breaking News

…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार

मुंबई : प्रतिनिधी

तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय… तुम्ही पुढे या… म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला… विशेष म्हणजे त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत जयंतराव पाटील यांनी फोटोही काढले

हा प्रसंग मुंबईच्या गोरेगाव येथील श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमात घडला.

बऱ्याच वेळेला राजकीय नेते आपल्या स्वभावाच्या माध्यमातून जनतेची मने जिंकत असतात. आज जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनीही सभागृहाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा सत्कार करत अनेकांची मने जिंकली…

यावेळी या हॉस्पिटलच्या परिचारिका सभागृहाच्या कोपऱ्यात उभ्या राहून कार्यक्रम पाहत होत्या. त्यांच्यापैकी अनेकांना जयंतराव पाटील यांना भेटण्याची इच्छा होती. जयंतराव पाटील यांना कळताच त्यांनी परिचारिकांना स्टेजवर येण्याचे आमंत्रण दिले व त्यांचा सन्मान केला शिवाय मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यापूर्वीही जयंत पाटील यांनी कोविडच्या पहिल्या लाटेच्यावेळी अधिपरिचारकांना असेच खुले पत्र लिहित मी तुमचा भाऊ असल्याचे सांगत तुमच्यासाठी मी सदैव सोबत राहीन असे आश्वासन दिले होते. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि बेघर असलेल्या नागरीकांसाठी अन्नाचा पुरवठा करत त्यांच्यासोबत जेवणही घेतले. यासह अनेक प्रसंगी थेट सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा, वेदनांमध्ये सोबत असल्याचे दाखवून देत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात.

लोकांमध्ये मिसळताना स्वत:चे मंत्रिपद आणि राजकिय व्यक्तीमत्व बाजूला ठेवून आपणही तुमच्यातलाच असल्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न असतो आणि सर्वसामान्य जनतेशी कायम आपली नाळ असल्याचे दाखवून देतात.

Check Also

न्यायालयाच्या निकालामुळे भाजपा नेत्यांच्या दाव्यातील फोलपणावर शिक्कामोर्तब मराठा आरक्षणचा रस्ता आता लांब पल्ल्याचा

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाविरोधात निकाल देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *