Breaking News

अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षप्रवेश केला.
या सर्व आमदारांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले. प्रवेश करणा-या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी झाली होती.
शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांचा वाद मिटवण्याचाही प्रयत्न झाला. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपा डेरेदाखल झाले आहेत. शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव यांनी पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडल्यानेच आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *