Breaking News

छत्रपतींचा आशीर्वाद घेवून राष्ट्रवादीच्या ‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ सुरु खा. डॉ.अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले पूजन

जुन्नरः प्रतिनिधी
नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली.
ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते. यावेळी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गडावरील देवीची पुजा व आरती करत नव्या स्वराज्याच्या लढ्याची सुरुवात करण्यात आली.
भाजप- शिवसेना सरकारच्या विरोधात पदयात्रा, हल्लाबोल आणि परिवर्तन यात्रा यशस्वीपणे काढल्यानंतर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात शिवनेरीवरुन विरोधाची तुतारी आज फुंकली.
ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर २८ ऑगस्टला होणार आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *